फोटोसंक्षिप्त-देवगड, हडपीडला 
प्रकटदिन उत्साहात

फोटोसंक्षिप्त-देवगड, हडपीडला प्रकटदिन उत्साहात

90939

देवगड, हडपीडला
प्रकटदिन उत्साहात
देवगड : तालुक्यात ठिकठिकाणी स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी महाप्रसाद वाटप झाले. येथील मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग होती. हडपीड येथील मठात भाविकांची गर्दी झाली होती. महाप्रसादासाठीही भाविकांची गर्दी होती. सर्वत्र उत्साही वातावरण होते. जामसंडे येथील मंदिरात भाविक दर्शनासाठी सतत येत होते. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


90940

बांदा-दाणोली मार्गावर
धोकादायक भगदाड
बांदा ः बांदा-दाणोली मार्गावर निमजगा प्राथमिक शाळेसमोर रस्त्याला मधोमध भगदाड पडल्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मुंबई, पुण्यातून आंबोली मार्गे गोव्यात जाणारे पर्यटक या रस्त्याचा वापर करत असल्याने वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी नजीकच प्राथमिक शाळा असून लहान मुलांचाही वावर असतो. वाहनांची व पादचाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी अंधारात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर भगदाड बुजविण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com