रत्नागिरी- संगीत राज्य नाट्य स्पर्धा निकालाच्या चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संगीत राज्य नाट्य स्पर्धा निकालाच्या चौकशीचे आदेश
रत्नागिरी- संगीत राज्य नाट्य स्पर्धा निकालाच्या चौकशीचे आदेश

रत्नागिरी- संगीत राज्य नाट्य स्पर्धा निकालाच्या चौकशीचे आदेश

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२३p४८.jpg- KOP२३L९०९६६ मुंबई : संगीत राज्य नाट्य स्पर्धेसंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन माहिती सांगताना संस्थांचे प्रतिनिधी.
------------
सं. राज्य नाट्यस्पर्धा निकालाच्या चौकशीचे आदेश

नाट्यसंस्थांचा आक्षेप; परीक्षकाकडून आचारसंहितेचा भंग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या संगीत राज्य नाट्यस्पर्धा निकालानंतर वादात सापडली आहे. या स्पर्धेच्या निकालाची चौकशी करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी दिले असून याबाबत अहवाल मागितला आहे, अशी माहिती संगीत नाटके सादर करणाऱ्या संस्थांनी दिली.
येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात अलिकेडेच हौशी मराठी संगीत नाट्यस्पर्धा रंगली. या स्पर्धेचे निकालपत्रही जाहीर झाले; मात्र आता हा निकाल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली, संक्रमण पुणे, खल्वायन रत्नागिरी आदी नाट्यसंस्थांनी आणि काहीनी व्यक्तीशः लेखी तक्रार करून दाद मागितली. त्यावर चौकशीचे आदेश मंत्र्यानी दिल्याचे वरील संस्थांनी दिले. या नाट्यसंस्था व रंगकर्मीच्या म्हणण्यानुसार, जाहीर झालेल्या निकालपत्रकामध्ये अनियमितता दिसत आहे. एकंदरीत स्पर्धा कालावधीतील परीक्षक मंडळातील परीक्षकाकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सन्माननीय परीक्षक मंडळातील सातत्याने गेली ३ वर्षे परीक्षक असलेल्या एका परीक्षकाकडून स्पर्धा कालावधीत आक्षेपार्ह वर्तन घडले आहे. स्पर्धा कालावधीत ते काही ठराविक स्पर्धकांच्या घरी जाऊन संपर्क साधून होते. काही स्पर्धक संघांना त्यांचे गावी जाऊन मार्गदर्शनही करत होते, असे त्या नाट्यसंस्था व रंगकर्मींचे म्हणणे आहे. स्पर्धेतील नाटकांचे समीक्षण लिहिणाऱ्या समीक्षकांना नाट्यप्रयोग झाल्यानंतर त्या प्रयोगाबद्दल टिप्स देत होते. दरम्यान, असाच प्रकार गेल्या वर्षीही झाल्याचा आक्षेप रंगकर्मीचा होता.
काही उत्तम व प्रामाणिक कलाकारांवर यामुळे अन्याय झाला आहे, असे ठाम मत व्यक्त करत तक्रारअर्ज सादर करणाऱ्या नाट्यसंस्था व रंगकर्मींनी ठळक मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये विशिष्ट परीक्षकांना यापुढे राज्य नाट्यस्पर्धेसाठी परीक्षक मंडळात नेमणूक देऊ नये शिवाय दरवर्षी परीक्षक मंडळातील सदस्य बदलण्यात यावेत.


चौकट
चित्रिकरणावरून पुनर्विलोकन करावे
महाराष्ट्र शासनाकडून या स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे या निकालाला स्थगिती देऊन चित्रिकरणावरून पुनर्विलोकन करून संबंधितांना अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा, अशा मागण्यांचा समावेश आहे. खल्वायन संस्थेतर्फे ६१व्या स्पर्धेपूर्वीही परीक्षक बदलणे व मानधन वगैरेसंदर्भात शासनाला पत्र देण्यात आले आहे.