शाळेला संगणक प्रदान

शाळेला संगणक प्रदान

- rat२४p१३.jpg ः
९१०७०
रत्नागिरी ः कशेळी जिल्हा परिषद शाळेला एलईडी, स्मार्ट टीव्ही व संगणक प्रदान करताना उद्योजक आण्णा सामंत.

कशेळी शाळेला एलईडी, स्मार्ट टीव्ही व संगणक प्रदान

रत्नागिरी ः तालुक्यातील कशेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांग १ मध्ये मुंबईतील औरा फार्मासीटीकल कंपनीच्या सौजन्यातून शाळेला एलईडी, स्मार्ट टीव्ही व संगणक देण्यात आला. हा कार्यक्रम उद्योजक आण्णा सामंत यांच्या हस्ते झाला. या वेळी कशेळी गावचे सरपंच दीपक बावकर, उपसरपंच चंद्रकांत कांबळे, सदस्य सुरेश ताम्हणकर, माजी सरपंच प्रकाश परपते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रवींद्र परपते, उपाध्यक्षा परपते तसेच नाणीज सरपंच गौरव संसारे, दत्ताराम शिवगण, विनायक शिवगण, देणगीदार महेश विष्णू बावकर, मुख्याध्यापक शिवराम किनरे, पदवीधर शिक्षक प्रविण कीणे, राऊत, खाकम आदी उपस्थित होते

-

जिल्हा परिषद अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता

रत्नागिरी ः जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय राज सुरु असून २०२३-२४ या वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा बजेट कधी सादर करणार आणि ते किती असणार याची उत्सुकता असणार आहे. प्रथमच पदाधिकारीविना हे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आपले स्वतःचे अंदाजपत्रक सादर करते. वर्षभरापूर्वी पदाधिकाऱ्‍यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. सध्या प्रशासकराज सुरु आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे २०२३-२४ चे अंदाजपत्रक ते सादर करणार आहेत. गतवर्षी पदाधिकारी असल्याने सर्वसाधारण सभा घेऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यात शामराव पेजे सभागृहात बजेट सादर करण्यात आले होते. २२ कोटींचे हे बजेट होते. यावर्षी या बजेटमध्ये वाढ होणार की नाही याबाबत उत्सुकता लागली आहे. साधारण २७ किंवा २८ मार्चला हे बजेट सादर होईल, असा अंदाज आहे.
-

गांधीधाम एक्स्प्रेसला काणकोण स्थानकावर थांबा

रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नेत्रावती तसेच गांधीधाम एक्स्प्रेसला दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. याचवेळी मागील काही वर्षांपासून संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबतच्या मागणीकडे मात्र रेल्वेने दुर्लक्ष केले आहे. या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरूवअनंतपुरम या नेत्रावती एक्स्प्रेसला २ एप्रिलपासून तर मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या नागरकोईल ते गांधीधाम एक्स्प्रेसला ४ एप्रिलपासून तर गांधीधाम ते नागरकोईल या गाडीला ७ एप्रिलपासून दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावर या आधीपासून थांब्यासाठी पाठपुरावा केल्या जाणाऱ्या संगमेश्वर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर का होईना थांबा मंजूर करण्याबाबत मात्र रेल्वेने कोणतेही पाऊल उचललेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com