सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम फत्ते

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम फत्ते

- rat२४p३.jpg-
९१०४५
हर्णै ः किल्ल्याच्या बाहेरील तोफ आतमध्ये सुरक्षित आणून तिची पूजा करण्यात आली.

- rat२४p४.jpg-
९१०४६
हर्णै ः मोहिमेत सहभागी गडकिल्ले संवर्धन संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य.

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतामोहीम

गडकिल्ले संस्थेचा पुढाकार ः तटबंदी, बुरूज झाले मोकळे
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. २४ ः गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने पुन्हा एकदा सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतामोहीम फत्ते करण्यात आली. यामुळे किल्ला संवर्धनाला हातभार लागणार आहे. या वेळी किल्ल्याच्या बाहेर अस्ताव्यस्त अवस्थेत आढळलेली तोफ सुरक्षितरित्या ठेवण्यात आली.
शिवकाळात जसे गिरीदुर्गांना महत्व होते तसे जलदुर्गांनाही होते. ''ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र'' हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी बऱ्‍याच जलदुर्गांची बांधणी केली. काही किल्ल्यांची डागडुजी केली. जसजसे दिवस बदलत गेले तसतसे हे गडकिल्ले दुर्लक्षित होत आहेत. दुर्गांची पडझड झाली. काही गडकिल्ले, जलदुर्गावरील वास्तू पडून गेल्या. या वास्तूंचे जतन संवर्धन व संरक्षण करण्यासाठी गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यावर स्वच्छतामोहीम राबवते. १९ मार्चला सकाळी ८ ते २ या वेळेत किल्ले सुवर्णदुर्ग या जलदुर्गावर संस्थेच्या युवक-युवतींनी स्वच्छतामोहीम राबवली. या वेळी गडाच्या तटबंदीवरती वाढलेली झुडपं व छोट्या झाडांची मुळं काढून टाकण्यात आली. बुरूजांवर वाढलेले गवत काढण्यात आले, अशी माहिती प्रतीक गमरे यांनी दिली.
या मोहिमेचे समाधान सर्व दुर्गसेवकांच्या चेहऱ्‍यावर दिसून येत होते. मोहीमेत कोकण विभाग अध्यक्ष शुभम रानम, राजेश काळे, प्रतीक गमरे, शुभम फाटक, अभिजित तिर्लोटकर, शंकर माळकर, अक्षय कोकरे, गुरू काळे, पंकज पुजारी, नितीन नारकर, संदीप कोकरे, प्रणय कोकरे, रामा तांबे, यासिर कांबळे, जगदीश शेळके, प्रणय पटकारे, सर्वेश कोकरे, सामिन शिंगे, अनिरुद्ध तिर्लोटकर, प्रशांत गुरव, सानिका रानम असे एकूण ४० जण दुर्गसेवक व दुर्गसेविका सहभागी झाले होते. या मोहिमेला हर्णै येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धाडवे, डॉ. रोहन पिंपळे व स्थानिक ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले.
-
तोफही ठेवली सुरक्षित
सुवर्णदुर्गावर संस्थेच्यावतीने रविवारी दुसरी मोहीम हाती घेण्यात आली होती. पहिल्या मोहिमेवेळी किल्ल्याच्या बाहेर अस्ताव्यस्त अवस्थेतील २ तोफा संस्थेच्या दुर्गसेवकांना दिसल्या होत्या. त्यातील एक ते पहिल्या मोहिमेवेळी गडाच्या आत नेऊन सुरक्षित जागी ठेवण्यात आली व दुसरी तोफ या मोहिमेवेळी किल्ल्यामध्ये आत नेऊन ठेवण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com