कलंबिस्त-कदमवाड़ी रस्ताकामाचे भूमिपूजन

कलंबिस्त-कदमवाड़ी रस्ताकामाचे भूमिपूजन

swt2417.jpg
91161
कलंबिस्त : कदमवाडी रस्त्याचे भूमिपूजन करताना शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे. बाजूला जिल्हाप्रमुख अशोक दळवी व ग्रामस्थ.

कलंबिस्त-कदमवाड़ी
रस्ताकामाचे भूमिपूजन
सावंतवाडी, ता. २४ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून कलंबिस्त-कदमवाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जीवन लाड, संजय पालकर, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, हर्षदा कदम, दर्शना बिडये तसेच परब, उदय सावंत, प्रकाश पास्ते, दत्ताराम बिडये, न्हानू धुरी, श्याम कलंबिस्तकर, दत्ताराम कदम, मधुकर कदम, वसंत कदम, सुरेश कदम, विजय कदम, संतोष कदम, विष्णू कदम, योगेश कदम, विनायक कदम, संचित पालकर, प्रथमेश कदम, श्रध्दा कदम, मीरा कलंबिस्तकर, सुचिता पालकर, श्रेयस पालकर, सुमित्रा कारीवडेकर, शुभांगी कदम, दिव्या कलंबिस्तकर, तन्वी कदम, प्रियांका कलंबिस्तकर, सौरभ कलंबिस्तकर, प्रणिता कदम, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव व वालावलकर आदी उपस्थित होते.
................
swt2418.jpg
91162
विलवडेः विलवडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दळवी यांच्याकडे लॅपटॉप सुपूर्द करताना विलास गावडे.

माजी विद्यार्थी संघटनेतर्फे
विलवडे हायस्कूलला लॅपटॉप
सावंतवाडी, ता. २४ः विलवडे हायस्कूल पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने राजा शिवाजी विद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने विलास गावडे यांनी हा लॅपटॉप विलवडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार चंद्रकांत दळवी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सरपंच प्रकाश दळवी, स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सदस्य परेश धर्णे, प्रमोद दळवी, सोनू दळवी, मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर उपस्थित होते. यावेळी गावडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत यापुढेही शाळेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मुख्याध्यापक हेवाळकर यांनी माजी विद्यार्थी संघटनेने यापूर्वीही शाळेसाठी इको गाडी देऊन शाळेची मोठी गरज पूर्ण केलेली आहे. आता शालेय कार्यालयीन कामकाजास अधिक गती मिळणार असल्याचे सांगून संघटनेचे आभार मानले. आभार सहाय्यक शिक्षक मुकुंद कांबळे यांनी मानले.
.................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com