अपुऱ्या औषधांमुळे रुग्णांचे हाल

अपुऱ्या औषधांमुळे रुग्णांचे हाल

84997

अपुऱ्या औषधांमुळे रुग्णांचे हाल

अधिकारीही हतबल; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

सावंतवाडी, ता. २५ : येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या औषध पुरवठ्यावरून येथे रुग्णांचे हाल होत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबत आक्रमक भूमिका जाहीर केल्यानंतर रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनरक्षा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज वैद्यकीय अधिकाऱ्यां‍ची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीच या संदर्भात स्वतः खंत व्यक्त केली. औषध पुरवठा वेळेवर होत नसल्याने आम्ही तरी करायचे काय? असा उलट प्रश्न अधिकाऱ्यांनी केल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी आदी उपस्थित होते. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधे नाहीत, ही गंभीर बाब आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पुरवठा करुन औषध पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती तथा जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष परिमल नाईक यांनी केली. दरम्यान, सावंतवाडीत होवू घातलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटत असल्याचे कळते, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु त्यापेक्षा गोरगरीब लोकांना औषध पुरवठा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. नाईक यांनी आपली भूमिका मांडली आहे.
--
कोट
औषध पुरवठा वेळेवर होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना साधे टीटी सारखे इंजेक्शनही बाहेरून आणून देण्यास सांगायला आम्हाला लाज वाटत आहे. त्यामुळे आम्ही तरी करायचे काय?
- वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी
--
कोट
91309
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तापासह टिटिची इंजेक्शनही उपलब्ध नाहीत. हॅण्डग्लोज नाहीत, अशी माहिती खुद्द वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील औषधे तातडीने पुरविणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आरोग्य यंत्रणेने दखल घ्यावी.
- परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com