वार्‍याने छोट्या मच्छीमारांना ब्रेक

वार्‍याने छोट्या मच्छीमारांना ब्रेक

- rat२५p१०.jpg
91315
रत्नागिरी ः कासारवेली येथे उभ्या केलेल्या नौका.

वाऱ्‍याने छोट्या मच्छीमारांना ‘ब्रेक’

नुकसानीच्या छायेत; मोठ्या मच्छीमारांच्या हाती बांगडा, म्हाकुळ

रत्नागिरी, ता. २५ ः गेले पाच दिवस समुद्रकिनारी भागात वाहणाऱ्‍या वेगवान वाऱ्‍यांनी गिलनेटसह छोट्या होडीतून होणारी मासेमारी थांबली आहे. दुपारनंतर वाऱ्‍याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात जात नाहीत. सध्या मोठ्या मच्छीमारांनाही नौकांना बांगडा, म्हाकुळ मासा मिळत आहे.
कोकणासह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभर वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली; मात्र सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात वारे वाहत आहेत. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांची अडचण झाली आहे. वाऱ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. फायदा होणार नसल्याने मच्छीमारांनी बंदरावर थांबणेच पसंत केले आहे. मोठ्या मच्छीमारांना बांगडा मिळत असल्याने ७० ते ८० रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपासून म्हाकुळ मासा मोठ्या मच्छीमारांच्या जाळ्याला लागत आहे. मात्र, सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे पुढील वर्षी म्हाकुळ तितकासा मिळणार नाही, अशी भीती मच्छीमारांकडून वर्तवली जात आहे. महाराष्ट्रच नव्हे तर अन्य राज्यातही यंदा बांगडा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे दरही यथातथाच आहेत.
------------
चौकट
डॉल्फिनचे वास्तव्य अजूनही
रत्नागिरीतील किनारी भागात यंदाच्या हंगामात डॉल्फिन मासा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हा मासा थंडीच्या मोसमात वास्तव्याला असतो. उन्हाचा कडाका सुरू झाला तरीही डॉल्फिन किनाऱ्‍यावर येत आहे. ते झुंडीने येत असल्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्याचे नुकसान करत आहेत.
-----------
कोट
गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या मच्छीमारांना अपेक्षित मासा समुद्रात मिळत नाही. वेगवान वारे सुरू झाल्याने अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत. मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्‍यांप्रमाणे मच्छीमारांनाही शासनाने मदत करावी.
- अभय लाकडे, मच्छीमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com