मंडणगड- आयएसओ शेनाळे शाळेचा गुणदर्शन सोहळा रंगला

मंडणगड- आयएसओ शेनाळे शाळेचा गुणदर्शन सोहळा रंगला

बातमी क्र. 15 (टुडे पान 3 साठी)

फोटो ओळी
-rat26p17.jpg-

शेनाळे : विविध गुणदर्शन कार्यक्रमात कला सादर करताना आयएसओप्राप्त शेनाळे शाळेचे विद्यार्थी.
......
आयएसओप्राप्त शेनाळे शाळेत
रंगला विविध गुणदर्शन सोहळा

मंडणगड, ता. २६ ः ‘शाळा माझी, मी शाळेचा’ ही भावना अंगीकारणाऱ्या आयएसओ शाळा शेनाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. पारंपरिक गीतांपासून स्वरचित गीते तसेच विविध समूहनृत्य, दीपनृत्य, विनोदी नाटिका अशा विविध कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
आयएसओ मानांकनप्राप्त शेनाळे शाळेत मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या संकल्पनेतून कलाविष्कार २०२३ विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक गणेश गुळेकर, सतीश खैरे, संदीप राठोड यांच्यासह ग्रामस्थ महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, शिरगावचे सरपंच विश्वनाथ सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन जाधव यांचे सहकार्य लाभले. ग्रामविकास मंडळ शेनाळेचे अध्यक्ष विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शाळेतील सर्व शिक्षकांचा यानिमित्त सन्मानपत्र देऊन ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र रेवाळे यांनी मार्गदर्शन केले.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com