आठवडाभरात 4 लाख 41 हजार महिलांचा प्रवास

आठवडाभरात 4 लाख 41 हजार महिलांचा प्रवास

आठवडाभरात ४ लाखांहून अधिक महिलांचा प्रवास

सवलतीचा फायदा एसटीला ; पाऊण कोटीचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : शिंदे-फडणवीस सरकारने एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिल्याच्या निर्णयाला ८ दिवस झाले. या आठ दिवसात महिला सन्मान योजनेला एसटी प्रवासात रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद झाली. दिवसाला ५० हजार प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या आता ७० हजारावर गेली आहे. आठ दिवसात ४ लाख ४१ हजार २६५ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून एसटीला पाऊण कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. सवलतीची तेवढीच रक्कम शासन एसटीला देणार आहे. तुटलेला प्रवासी वर्ग एसटीला मिळू लागला असून वडापला फटका बसला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
महिला दिनाचे औचित्य साधून शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. १७ मार्चला या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्ह्यात एसटीच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे १ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी ३५ टक्के महिलावर्ग प्रवास करतो, असा एसटी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार दरदिवशी जिल्ह्यातील ५६ हजार महिलांना या योजनेचा लाभ होणार असल्याचा अंदाज आहे. योजना लागू झाल्यापासून एसटी प्रवासातील महिलांची संख्या वाढत चालली आहे. आता दिवसाला ७० हजाराच्यावर महिला प्रवास करीत आहेत.
-
तारीख*प्रवासी महिला*मिळालेले उत्पन्न

१७ मार्च*१५ हजार ३०६*१ लाख ९३ हजार ५९१
१८ मार्च*५१ हजार ३५६*८ लाख ०८ हजार ४१९
१९ मार्च*५६ हजार ६६७*१० लाख ५६ हजार ७२०
२० मार्च*६६ हजार ६५०*११ लाख १५ हजार ३३९
२१ मार्च*७० हजार ८८२*१२ लाख ७२ हजार ०२६
२२ मार्च*४४ हजार ०७५*८ लाख ७४ हजार ५८९
२३ मार्च*६५ हजार ५९८*११ लाख ०७ हजार ९५६
२४ मार्च*७० हजार ७२२*१२ लाख २५ हजार ३३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com