दुचाकी-एसटी धडकेत
दुचाकीस्वार गंभीर

दुचाकी-एसटी धडकेत दुचाकीस्वार गंभीर

91499
नांदगाव ः पाटीलवाडी येथे दत्तमंदीर बसस्थानकाजवळील अपघातग्रस्त एसटी व दुचाकी.


दुचाकी-एसटी धडकेत
दुचाकीस्वार गंभीर
नांदगाव, ता. २६ ः मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव-पाटीलवाडी येथे दत्तमंदीर बसस्टॉप जवळ उभ्या एसटीवर मागून दुचाकीस्वार आदळल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात काल (ता.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ः कणकवलीच्या दिशेने जाताना एसटी नांदगाव-पाटीलवाडी येथील दत्तमंदिर बसस्टॉप येथे प्रवाशी चढण्यासाठी थांबली होती. याचवेळी नांदगावरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या युवकाचा ताबा सुटल्याने दुचाकीस्वार सरळ त्या एसटीवर आदळला. ही धडक इतकी गंभीर होती की यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेने तातडीने कणकवली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले; मात्र, उशिरापर्यंत अपघाताची नोंद नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com