दिव्यांगांसाठी जमवला विद्यार्थ्यांनी निधी

दिव्यांगांसाठी जमवला विद्यार्थ्यांनी निधी

-rat२६p३३.jpg-
९१५५७
पाटपन्हाळे (ता. गुहागर) ः दिव्यांग निधी संकलन करणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार करताना मान्यवर.
--
दिव्यांगांसाठी जमवला विद्यार्थ्यांनी निधी

पाटपन्हाळे स्कूलचे विद्यार्थी ; गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेला मदत

पावस, ता. २६ : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक मदतीचे योगदान दिले. यानिमित्ताने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व न्यू इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
या वेळी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सल्लागार सुधाकर कांबळे, प्रकाश बापट, पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे गुहागर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी दिव्यांग निधी संकलित करून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला आर्थिक मदत करतात. संस्थेतर्फे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दिव्यांग निधी संकलनासाठी निधी कार्ड वितरित केल्यानंतर जे विद्यार्थी २०० रुपयांपेक्षा अधिक निधी संकलित करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी सन्मानपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com