गणेशगुळे किनाऱ्यावर प्रथमच धावली कासवाची पिल्ले

गणेशगुळे किनाऱ्यावर प्रथमच धावली कासवाची पिल्ले

-rat२७p१३.jpg ः
९१६७९
पावस ः गणेश गुळे समुद्रावर कासवाची पिल्ले सोडताना श्री सचिन तोडणकर
-
-rat२७p१७.jpg ः
९१६९६
गणेशगुळे किनाऱ्यावर काठ्या लावून घरट्यांचे संरक्षण करण्यात आले आहे.
--
गणेशगुळे किनाऱ्यावर प्रथमच धावली कासवाची पिल्ले

सहा घरट्यांचे संरक्षण ; सव्वाशे पिल्ले झेपावली समुद्रात

पावस, ता. २७ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर नव्याने ऑलिव्ह रिडले कासवांची तीन घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यामध्ये ३१७ पिल्लांचा समावेश आहे. आत्तापर्यंत सहा घरटी सापडली असून १२५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे हा किनारा कासव संवर्धन केंद्र बनण्याची शक्यता असून पर्यटकांचाही या केंद्राकडे ओढा वाढण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत गावखडी समुद्रकिनाऱ्यावर कासवांची पिल्ले मोठ्या प्रमाणात सापडत होती. त्यामुळे त्यांचे संवर्धन केंद्राचे काम चांगल्या प्रकारे सुरू होते. त्यामुळे अन्य समुद्रकिनाऱ्यावरती कासवप्रेमी व वनविभागाचे लक्ष नव्हते. फेब्रुवारी महिन्यामध्ये गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रथमच १२५ अंड्यांचे घरटे सापडले. गणेशगुळे किनाऱ्यावर पहिले घरटे सापडल्यानंतर लागोपाठ घरटी सापडण्यास सुरवात झाली. तेथील स्थानिक ग्रामस्थांनी संवर्धन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. त्यानंतर वनविभागाने त्या परिसराची पाहणी केली. पहिले घरटे सचिन तोडणकर यांना सापडले. शेखर रामचंद्र तोडणकर यांना दोन घरटी सापडली. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ३२० अंडी संरक्षित करण्यात आली. त्यापैकी पहिल्या घरट्यातील १२५ पिल्ले सचिन तोडणकर यांनी समुद्रामध्ये सोडली आहेत. नव्याने तीन घरटी शेखर तोडणकर यांना सापडली असून त्यामध्ये ३१७ अंड्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील किनाऱ्यावर आत्तापर्यंत ६३७ अंड्याचे संरक्षण करण्यात आले आहे.
-
ग्रामस्थांच्या मदतीने घरट्यांचे संरक्षण
यासंदर्भात पोलिसपाटील संतोष लाड म्हणाले, या परिसरात प्रथमच कासवाची घरटी सापडली आहेत. त्यांचे संवर्धन करण्याचे काम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. आजपर्यंत सहा घरटी सापडली आहेत. त्यामुळे घरट्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने वनविभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com