चिपळूण ः बहादूरशेख नाका येथे सर्विसरोडच्या काँक्रिटचे काम पूर्ण

चिपळूण ः बहादूरशेख नाका येथे सर्विसरोडच्या काँक्रिटचे काम पूर्ण

फोटो ओळी
-rat२७p२.jpg ःKOP२३L९१६६२ चिपळूण ः शहरातील एका सर्विस रोडचे काँक्रिटीकरण झाले आहे. त्यावरून नियमित वाहतूक सुरू झाल्यामुळे आता वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
--------
बहादूरशेख नाक्यातील
सेवारस्त्याचे काँक्रिटचे काम पूर्ण

वाहतूक कोंडीतून सुटका ; वाहनचालकांना दिलासा
चिपळूण, ता. २७ ः बहादूरशेख नाका येथे सर्विसरोडच्या काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नाक्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. त्यामुळे प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चिपळूण शहरातून जात आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणात चिपळूण शहरात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुलाच्या खाली दोन्ही बाजूने सर्विस रोड असणार आहे. सद्यःस्थितीत गणपती मंदिर ते बहादूरशेख नाका या दरम्यान एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मागील काही दिवसापासून हे काम सुरू होते. त्यामुळे एकाच रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. मुळात शहरातून जाणारा चौपदरीकरणाचा रस्ता अरूंद असल्यामुळे वाहनांची ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. बहादूरशेख नाका येथून कळंबस्तेकडे जाणारा एक रस्ता बंद करण्यात आला होता तसेच बहादूरशेख नाका ते गणपतीमंदिर या दरम्यानचा रस्ताही एकेरी सुरू होता. त्यामुळे बहादूरशेख नाका येथील चौकात सकाळी सातपासून रात्री अकरापर्यंत सतत वाहतूककोंडी होत होती. अनेकवेळेला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत होत्या. पाच मिनिटाच्या अंतरासाठी तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करावी लागत होती. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्यामुळे मुंबईतून येणारे चाकरमानी वाहनांना ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी गडबड करायचे. त्यामुळे वाहने अडकून मोठी वाहतूककोंडी व्हायची. या कोंडीत अडकू नये म्हणून काहीजण काविळतळी मार्कंडी-चिंचनाकामार्गे शहरात येत होते तर काहीजण गुरूकूल नगर परिसरात प्रवेश करून बहादूरशेख नाका येथील मच्छीमार्केट परिसरात बाहेर पडत होते.
येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसा चार ते पाच पोलिस कर्मचारी, दोन होमगार्ड आणि महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारी तैनात होते. गणपतीमंदिर ते बहादूरशेख नाका या दरम्यानचा एक रस्ता संपूर्ण काँक्रिट करून झाला आहे. या रस्त्यावरून वाहने बहादूरशेखच्या दिशेने जातात आणि जुन्या रस्त्यावरून वाहने चिपळूणच्या दिशेने येतात. त्यामुळे आता वाहने चौकात अडकून पडण्याचा प्रकार कमी झाला आहे. सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी चार ते सात यादरम्यान बहादूरशेख नाका येथील चौकात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तरीही येथे पूर्वीप्रमाणे वाहतूककोंडी होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com