कासव संवर्धनात वनविभागाची प्रगती

कासव संवर्धनात वनविभागाची प्रगती

91712
वेंगुर्ले ः कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. शेजारी इतर.


कासव संवर्धनात वनविभागाची प्रगती

के. मंजुलक्ष्मी; वायंगणीत कासव महोत्सव आयोजनाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः वायंगणीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर स्थानिक कासवमित्र तसेच वन विभागाच्या दक्षतेमुळे दुर्मिळ अशा समुद्री कासव प्रजातीचे संरक्षण व संवर्धन उत्तमरित्या होत आहे. कासव संवर्धन व जतनामध्ये वनखात्याची प्रगती दिसून येते. या उत्कृष्ट कार्याबाबत वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच कासव घरटी संरक्षित करणाऱ्या कासवमित्रांचे कौतुक आहे. कासव जतन व संवर्धन जनजागृती अंतर्गत पर्यटन महोत्सव पुढील वर्षी आयोजित करावा, त्यासाठी शासनामार्फत सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वायंगणी येथे केले.
सावंतवाडी वनविभागातर्फे वायंगणी (ता.वेंगुर्ले) बीच येथे आयोजित केलेल्या ‘कासव महोत्सव वायंगणी २०२३’ च्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाले. या कासव महोत्सवात वायंगणी किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव जातीने लावलेल्या ४ घरट्यांतून काल (ता. २६) ४१५ कासव पिल्ले बाहेर आली. ही पिल्ले जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते व कोल्हापूरचे जीएसटी कमिशनर शबरीश पिलाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गोव्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर, सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या उपस्थितीत सागरी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे, बेस्ट पॉवर लिफ्टर अनुजा तेंडोलकर, डॉ. एस. एम. रोहिदास, कांदळवन कक्षाच्या उपजीविका तज्ज्ञ दुर्गा टिंगळे, मठ-वेंगुर्ले वनपाल सावळा कांबळे, वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, माणगाव वनपाल श्रेया परब, नेरुर वनपाल श्री. मेतर, गोठोस वनपाल महेश पाटील, वनकर्मचारी शंकर पाडावे, राहुल मयेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘शासनाने वनखात्यामार्फत २००३ पासून स्थानिक किनाऱ्यावरील नागरिकांना कासव संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये ३००० कासवे समुद्रात सोडली गेली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्याची संख्या २१ हजार झाली. हे वन विभागाचे काम कौतुकास्पद आहे.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर म्हणाले ‘‘कासव जतन व संवर्धनाची खरी गरज का आहे, याबाबत स्थानिक मच्छीमारांकडे केलेल्या चौकशीत जी काही माहिती दिली गेली, त्यावरून कासव हे मच्छीमारांसाठी उपयोगी असल्याचे समजले.’’ दरम्यान, वायंगणी-हुलमेकवाडी बीचवर कासव महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी गोवा- मुंबई येथून पर्यटक आले होते. यावेळी देवगडचे सागर मालवणकर, प्रा. अ. के. बिराजदार, वायंगणी माज़ी तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश तांडेल, वृंदा मोर्डेकर, खानोलीच्या तलाठी मिनल चव्हाण, वायंगणी ग्रामपंचायत प्रशासक संदेश परब आदी उपस्थित होते. यावेळी कासव जतन व संवर्धनासाठी मेहनत घेऊन काम करणाऱ्या मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, कासवमित्र घनःश्याम तोरस्कर, संतोष साळगावकर, प्रमोद वेळकर, सूरज तोरस्कर, शंकर रावले, प्रकाश साळगावकर, हेमंत शेलटकर, भालचंद्र तोरस्कर, प्रकाश खोबरेकर, सुहास तोरस्कर आदींचा मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
................
चौकट
अन् कासवाची पिल्ले झेपावली समुद्रात
नैसर्गिक अधिवासात तालुक्याच्या किनारपट्टी भागात उभादांडा, कालवीबंदर, दाभोली, निवती, फळयेफोंडा, भोगवे, मोचेमाड, केळुस-मोबारवाडी, उभादांडा-वाघेश्वरवाडी, वायंगणी, वेळागर, सागरतीर्थ, साळगावकरवाडी, सुखटनबाग आदी भागांत एकूण ३७९ कासव घरटी लावली गेली होती. त्यातून अंदाजे ३८,१५० अंडी होती. या अंड्यांतून १०,२६७ एवढी पिल्ले बाहेर आली. तर २,२४४ अंडी खराब झाली. कासव पिल्ले बाहेर आलेल्या १२,३०७ अंड्यांतून कासव पिल्ले चालू हंगामात घरट्यातून बाहेर येत सागरी अधिवासांत सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाने कासव उत्सवात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com