ज्ञानदीप कलामंचचा काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

ज्ञानदीप कलामंचचा काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

खेड ः चवदार तळे सत्याग्रह दिन विशेष ज्ञानदीप कलामंच महाराष्ट्र आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रामधून ६१ साहित्यिक कवी/कवयित्री यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे सर्वोत्कृष्ट कवी गणेश निकम (चाळीसगाव गणेशपूर), उत्कृष्ट कवी संजय कापसे (मुंबई), प्रथम क्रमांक- यशवंत पगारे (बदलापूर), द्वितीय कवयित्री वनिता ऐळींजे (चेंबूर मुंबई), तृतीय कवी प्रकाश जाधव (चिपळूण, रत्नागिरी), उत्तेजनार्थ कवयित्री संगीता माने, प्रांजली काळबेंडे (वसई), कवयित्री लोपामुद्रा शहारे (नागपूर), कवी सुभाष मानवटकर (नागपूर), पांडुरंग आलीम (रत्नागिरी). राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप कलामंच महाराष्ट्र समूह मार्गदर्शक कवी शिवाजी मोहिते, समूह प्रशासक कवी संदेश गमरे, समूह प्रशासक रामचंद्र जाधव, समूह प्रशासक तथा ग्राफिक्सकार कवयित्री पुनम गमरे तसेच सहसमूह प्रशासक स्वरा गमरे, विशाल मोरे, केवल सोनावणे आणि संपूर्ण काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण सिराज शिकलगार (सांगली) यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com