श्री सदस्यांनी रस्ते स्वच्छतेचा उचललाय विडा

श्री सदस्यांनी रस्ते स्वच्छतेचा उचललाय विडा

-rat२७p३०.jpg ः
९१७७६
गुहागर ः महामार्ग स्वच्छ करताना श्री सदस्य.
-
श्री सदस्यांची गुहागरमध्ये स्वच्छता मोहीम

महामार्गावरील रस्ता चकाचक; नगरपंचायतीचे सहकार्य

गुहागर, ता. २८ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गुहागरमधील श्री सदस्यांनी गुहागर-विजापूर मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली. शहरापासून दोन किमीचा रस्ता श्री सदस्यांनी स्वच्छ केला.
गुहागर शहरातील श्री सदस्यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी गुहागर-विजापूर हा मुख्य मार्ग आणि शहरांतर्गत रस्ते दत्तक घेतले आहेत. डिसेंबर महिन्यापासून श्री सदस्य या रस्त्यांची सातत्याने स्वच्छता करत आहेत. दर महिन्याचा चौथा रविवार हा स्वच्छतामोहिमेसाठी गुहागरमधील श्री सदस्यांनी निश्चित केला आहे. दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये रविवारच्या स्वच्छतामोहिमेचे नियोजन केले जाते. स्वच्छतेसाठी लागणारी केरसुणी, कोयती, घमले, फावडे, खंटी आदी साहित्य सर्वांनी आणायचे असते. याशिवाय पाणी, वाहन, यांची व्यवस्था पहाणारे सदस्य निश्चित केले जातात. एकत्र येण्याची वेळ ठरवली जाते. गट करून स्वच्छतेचे भाग वाटून दिले जातात.
मार्च महिन्याच्या चौथ्या रविवारी (ता. २६) श्री सदस्यांनी हे रस्ते स्वच्छ केले. श्री सदस्यांच्या या उपक्रमाला सहकार्य करत गुहागर नगरपंचायतीने गोळा केलेला कचरा भरण्यासाठी वाहनांची मोफत उपलब्धता करून दिली होती. त्याचप्रमाणे आणखी आवश्यक वाहने श्री सदस्यांनी आणली होती. या मोहिमेमध्ये दोन टन ओला तर एक टन सुका कचरा गोळा करण्यात आला. हा सर्व कचरा नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पामध्ये टाकण्यात आला.

-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com