रत्नागिरी ः परदेशी पर्यटकांनी चाखली हापूसची चव

रत्नागिरी ः परदेशी पर्यटकांनी चाखली हापूसची चव

- rat२७p२२.jpg-
91733
गणपतीपुळे ः येथील महिला बचत गटांच्या प्रदर्शनात खरेदीसाठी आलेले रशियन पर्यटक.

- rat२७p२१.jpg ः
91732
विक्री व प्रदर्शनात हापूसची चव चाखताना कझाकिस्तानची महिला पर्यटक. (छाया ः हर्षल कुळकर्णी, रत्नागिरी)

परदेशी पर्यटकांनी चाखली हापूसची चव

रशिया, कझाकिस्तानच्या पर्यटकांची गणपतीपुळेतील प्रदर्शनाला भेट

राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः ‘मला आंबा खूपच आवडला. ते गोड फळ आहे,’ अशी प्रतिक्रिया इंग्रजीमध्ये व्यक्त करत रशियातील मॉस्कोसह कझाकिस्तान, युरोपमधून गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांनी हापूसची चव चाखली. कझाकिस्तानच्या महिलेने तर जागेवरच सहा आंब्यांवर ताव मारला. यावेळी हापूससह पल्प, काजूगर, आंबा लोणचे खरेदी करून कुटुंबीयांनी चाखायला देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
गणपतीपुळे येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला विदेशी पर्यटकांनी भेट दिली. वस्तू खरेदी करताना भाषेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी ‘माविम’चे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी अंबरिश मिस्त्री यांनी इंग्रजीमधून संवाद साधला. मालगुंड, गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी बचत गटांच्या प्रदर्शनात वस्तूंची खरेदी केली. भारतामध्ये फिरण्यासाठी आल्यानंतर त्यांना हापूसबद्दल माहिती मिळाली होती. या प्रदर्शनात ठेवलेल्या हापूस आंब्यासह त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांच्या खरेदीसाठी ते सरसावले. त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची थोडी अडचण येत होती. त्यांचे इंग्रजीही तुटकतुटक होते. आंब्याची चव चाखताच हरखून त्यांनी कौतुक केले. त्यांनी दोन डझन आंबे खरेदी केले. त्याचबरोबर अन्य वस्तूंचीही त्यांनी खरेदी केली.
या प्रसंगी रशियातील मॉस्कोमधून आलेले पर्यटक श्री. गेट यांनी गणपती मंदिर पाहिल्यानंतर प्रदर्शनातील सोलकडीचा आस्वाद घेतला. ते म्हणाले, ‘सोलकडी हे पेय तिखट आहे. मला तिखट पदार्थ आवडतात. हापूसची चवही छान आहे. मॉस्कोला असलेल्या पत्नीसाठी मी आंबे खरेदी केले आहेत. तसेच या प्रदर्शनातील आंबा लोणचे, चटणी, आंबा पल्पही खरेदी केले आहे. काजूगरही मला खूप आवडले. भारतात आतापर्यंत फिरलेल्या पर्यटनस्थळांवर मला चांगला अनुभव आला. गणपतीपुळेतील लोकांचेही सहकार्य मिळाले. अजून अनेक ठिकाणे फिरायची आहेत. या प्रदर्शनातील महिलांचे काम कौतुकास्पद असेच आहे.’
--------------------
चौकट
तिने अर्धा डझन आंबे केले गट्टम!
गणपतीपुळेत आलेल्या कझाकिस्तानच्या महिला पर्यटकाने एका स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेल्या हापूसची चव चाखली. स्टॉलवरील महिलांनी आंबा कापून त्याच्या फोडी करून दिल्या. पिकलेल्या हापूसची चव चाखल्यानंतर ती महिला आनंदित झाली. त्यांनी अक्षरशः जागेवर नाचूनच आंबा आवडल्याचे जाहीर करून टाकले. तिने तिथेच सहा आंबे खाल्ले, तर दोन डझन आंबे खरेदी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com