सावंतवाडीत लवकरच नेत्र रुग्णालय

सावंतवाडीत लवकरच नेत्र रुग्णालय

91821
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना अनंत उचगावकर आदी.


सावंतवाडीत लवकरच नेत्र रुग्णालय

अनंत उचगावकर; ९ एप्रिलला उद्‍घाटन, ‘नॅब’चा पुढाकार

सावंतवाडी, ता. २७ ः शहरातील भटवाडी येथे गोरगरिब दृष्टीबाधितांसाठी नॅब संस्थेने येथे उभारलेले रुग्णालय ९ एप्रिलला सेवेत दाखल होणार आहे. यावेळी उद्योजक भावेश भाटिया यांच्या हस्ते या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील दृष्टीबाधितांना अत्यंत माफक दरात उपचार करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील नेत्र रुग्णांसाठी सर्व उपचार मोफत होतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नेमिनाद खोत, बंनजी वस्तवाल, आबा कशाळीकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर, नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईड इंडीयाचे अध्यक्ष हेमंत टकले, नॅब महाराष्ट्रचे रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्र सचिव गोपी मयुर, सहाय्यक सचिव मुक्तेश्वर मुनगंटीवार, रोटरी गव्हर्नर डॉ. गिरीष मसुरकर, रोटरी माजी गव्हर्नर संग्राम पाटील, माजी गव्हर्नर धोंड इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्यांसाठी व दृष्टीबाधितांसाठी उपयुक्त असे नेत्र रुग्णालय, नॅब कार्यालय, औषधालय आणि कम्युनिटी हॉल अशा बहुउद्देशीय हेतूने ही इमारत उभारण्याचे काम हाती घेतले. ‘‘नॅब सिंधुदुर्ग व नॅब सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडीचे कामकाज चालविले जाणार आहे.’’
--------
चौकट
खेड्यापाड्यात नेत्रचिकित्सा शिबिरे
रोटरी क्लबच्या ग्लोबल ग्रॅन्टच्या माध्यमातून लवकरच आपल्या नॅब संस्थेला रुग्णवाहिका मंजुर होईल. त्याद्वारे खेडोपाडी जाऊन नेत्रतपासणी शिबिरे घेणे शक्य होणार आहे. दृष्टीबाधितांना ने - आण करण्यासाठी याचा वापर होणार आहे, असेही श्री. उचगावकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com