ओझर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओझर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ओझर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

91697
नीलेश तोंडवळकर

ओझर येथील तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
मालवण, ता. २७ : ओझर येथे एका तरुणाने आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. नीलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२, रा. तोंडवळी वरची) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी दहाच्‍या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत स्थानिकांना दिसला. हा मृतदेह नीलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचा भाऊ गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय यादव, उपनिरीक्षक नितीन नरळे, हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण, सुशांत पवार आदींनी पंचनामा केला. नीलेश तोंडवळकर हे आज सकाळी आठला घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी साडेनऊला ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी दुचाकी उभी केलेली दिसून आली. दहाच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसह स्थानिकांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.