पत्रकारितेत समाजभान महत्त्वाचे

पत्रकारितेत समाजभान महत्त्वाचे

swt2733.jpg
L91829
वेंगुर्लेः तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार प्रदान करताना गटविकास अधिकारी मोहन भोई, निवडणूक नायब तहसीलदार संदीप पानमंद, डॉ. राजन खांडेकर आदी.

पत्रकारितेत समाजभान महत्त्वाचे
एम. के. गावडेः वेंगुर्लेत पत्रकार पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ः पुरस्कारांतून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र निर्माण होते. पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांच्या हातून यापुढेही चांगले काम घडेल, असा विश्वास आहे. पत्रकारांनी समाजातील लोकांच्या समस्या, प्रश्न याला वाचा फोडताना प्रशासनाच्या चुका सुद्धा आपल्या लेखणीतून वेळोवेळी दाखवून द्याव्यात. आज सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यामध्ये स्पर्धा आहे; मात्र प्रिंट मीडिया जिवंत राहिला तरच प्रसिध्दी माध्यमांत समतोल राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सहकार तज्ज्ञ एम. के. गावडे यांनी येथे केले.
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आज येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून वेंगुर्ले निवडणूक नायब तहसीलदार संदीप पानमंद, गट विकास अधिकारी मोहन भोई, डॉ. राजन खांडेकर, जयप्रकाश चमणकर, प्रज्ञा परब, मुख्याध्यापक आत्माराम उर्फ दादा सोकटे, श्रीनिवास गावडे, नितीन मांजरेकर, उमेश येरम, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी संजय मालवणकर कुटुंबीयांकडून पुरस्कृत (कै.) संजय मालवणकर स्मृती पुरस्कार पत्रकार प्रथमेश गुरव यांना, अरुण काणेकर कुटुंबीयांकडून पुरस्कृत (कै.) अरुण काणेकर स्मृती पुरस्कार योगेश तांडेल यांना, पी. ए. केसरकर कुटुंबीयांकडून पुरस्कृत (कै.) पांडुरंग अनंत तथा शशिकांत केसरकर स्मृती पुरस्कार पत्रकार अजय गडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त एस. एस. धुरी यांचाही सन्मान करण्यात आला. तळागाळातील ग्रामीण जनतेच्या समस्या, व्यथा, वेदना वृत्तपत्राद्वारे व सोशल मीडियाद्वारे समाजासमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार करीत असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्राबरोबर पत्रकारितेतही करिअर करावे, असे चमणकर यांनी सांगितले. पत्रकारितेत आज मोठे बदल झाले आहेत. सर्वच क्षेत्रावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतात. त्यासाठी पत्रकारामध्ये निःपक्षपातीपणा, प्रामाणिकपणा शोध घेण्याची वृत्ती, वेळेचे भान, संयम, संभाषण कौशल्य व समयसूचकता हे गुण असावेत, असे डॉ. खांडेकर म्हणाले. स्वागत प्रदीप सावंत यांनी, तर सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले. आभार सचिव अजित राऊळ यांनी मानले.

चौकट
पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे
ज्ञान, समाज प्रबोधन व मनोरंजन या तीन कारणांसाठी आज वृत्तपत्रांचे वाचन केले जाते. आज पत्रकारांवर काही ठिकाणी हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत; पण पत्रकाराचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे गरजेचे आहे, असे निवडणूक नायब तहसीलदार पाणमंद म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com