संक्षिप्त

संक्षिप्त

rat२८१५.txt

बातमी क्र. १५ (टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
91860
रत्नागिरी ः साळवी स्टॉप येथील कचऱ्याचा ढीग काढून हा परिसर सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने स्वच्छ झाला.
----------------
सौरभ मलुष्टेंनी केला स्वखर्चातून
साळवी स्टॉपचा परिसर स्वच्छ

रत्नागिरी ः साळवी स्टॉप हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथील एका खासगी जागेत टाकण्यात येणारा कचरा येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. ही बाब या परिसरातील नागरिकांनी येथील उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या निदर्शनास आणून दिली. पालिका प्रशासनाने खासगी जागा असल्याने तेथील कचरा उचलण्यास नाकार दिला. अखेर नागरिकांची समस्या लक्षत घेऊन तरुण उद्योजक आणि समाजसेवक सौरभ मलुष्टे यांनी स्वखर्चातून कचरा उचलून परिसर स्वछ केला. साळवी स्टॉप येथील या मोकळ्या जागेत कचरा साठल्याने परिसर अस्वछ झाला होता. या प्रभागात स्वछतेसाठी मलुष्टे नेहमीच पुढाकार घेतात. त्यांनी कचरा उचलण्यासाठी योग्य नियोजन केले. स्वखर्चातून दोन ट्रॅक्टर, जेसीबी व खासगी कामगार दिल्यामुळे येथील कचरा उचलल्याने हा सर्व परिसर स्वच्छ झाला. कचऱ्याची समस्या मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
-------------
फोटो ओळी
91863
संगमेश्वर ः श्रीराम मंदिरातील मूर्ती.
-------------
कळंबस्ते-मळदेवाडीत उद्या
श्रीरामनवमी जन्मोत्सव
संगमेश्वर ः तालुक्यातील कळंबस्ते पंचक्रोशीतील मळदेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमी उत्सव गुरुवारी (ता. ३०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव मंडळातर्फे केले आहे. श्रीराम सेवा मंडळ मळदेवाडीतर्फे गेली ३९ वर्षे हा सोहळा साजरा केला जातो. त्याचे नामांतर श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट मळदेवाडी असे झाले आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या गावांतील भाविक, भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होऊन प्रवचन, दुपारी श्रीराम जन्मोत्सव, दिंडी, महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजन, हरिपाठ, कीर्तन आणि रात्री नमन आदी कार्यक्रम होणार आहेत.
...............

फोटो ओळी
91864
देवरूख ः विद्यार्थ्यांना लिक्विड सोपचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रशिक्षिका शिर्के, पंडित व प्रा. शेट्ये.
..................
सप्रे-पित्रे महाविद्यालयात
स्वयंरोजगार प्रशिक्षण
देवरूख ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता. कार्यशाळेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. पाटील यांनी काळाची गरज लक्षात घेऊन प्रत्येक युवकाने विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. शिल्पा शिर्के यांनी फिनेल तयार करणे व विविध प्रकारचे लिक्विड सोप तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. कार्यशाळेत ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. शिर्के यांनी प्रात्यक्षिकांबरोबरच विक्रीसाठी आवश्यक माहिती व विक्रय कला याबाबत मार्गदर्शन केले. शिल्पा पंडित यांनी ‘विविध कौशल्ये व त्यामधील अर्थार्जन संधी’ याबाबत मार्गदर्शन केले. महिला विकास कक्षप्रमुख प्रा. सानिका भालेकर यांनी सूत्रसंचालन केले.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com