कुडाळ हायस्कूल सवंगड्यांचा भोगवेत स्नेहमेळा

कुडाळ हायस्कूल सवंगड्यांचा भोगवेत स्नेहमेळा

91906
भोगवे ः कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

कुडाळ हायस्कूल सवंगड्यांचा भोगवेत स्नेहमेळा

गतस्मृतींना उजाळा; १९७९-८० बॅच बारावी कला शाखेचे विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः कुडाळ हायस्कूल, ज्युनियर कॉलेजमधील १९७९-८० चे बारावी कला शाखेचे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन भोगवे समुद्र किनारी वायंगणकर संचालित रिसॉर्टवर नुकतेच झाले. स्नेहसंमेलनासाठी महिला-पुरुष मिळून एकूण २२ जणांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंगेश मराठे यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवृत नायब तहसीलदार ऋतुजा कुबल होत्या. सुनील अमरे यांनी त्यांच्या सुचनेला अनुमोदन दिले. अध्यक्षांच्या सहकारी म्हणून रंजना कामत यांची निवड करण्यात आली. प्रथम महेश भांडारकर यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मित्र-मैत्रिणींनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार बोडेकर यांनी आपल्या हातचलाखीतून काही जादूचे प्रयोग करून सर्वांना आश्चर्यचकित करत मने जिंकली. ग्रुपचे अॅडमिन भालचंद्र परब यांनी सुरेल आवाजात सुश्राव्य भजन सादर केले. महाराष्ट्र पोलिस सेवेतून आयपीएस या पदावरून निवृत्त झालेले व गायनाची आवड असलेले भालचंद्र धुरी यांनी सुरस अशी हिंदी-मराठी गिते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. शीला सावंत-भोसले यांच्या गान मैफल सादरीकरणाने सर्वांची वाहवा मिळविली. आयोजक विनायक आजगावकर यांनी दशावतारातील श्रीकृष्ण आणि संतोष सामंत (आंदुर्ले) यांनी रुक्मिणी सादर करून धमाल केली. दशावतार सादरीकरणामुळे स्नेहसंमेलनात वेगळेच वातावरण निर्माण झाले. सुनील अमरे, नंदकुमार बोर्डवेकर, किशोर शिर्सेकर, अनंत सामंत, तुषार पणदूरकर, दिलीप प्रभुखानोलकर, शामसुंदर चव्हाण, महेश भांडारकर, अरुण रणशिंग, मंगेश मराठे, मधुकर कुबल, राजन कांबळी, शरद आकेरकर, सहदेव मेस्त्री, रंजना कामत, शीला सावं- भोसले, ऋतुजा कुबल, तारका परब-गावडे, सुमंगल परब-नलावडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com