वीर मराठा काळसूर कौढर संघ विजेता

वीर मराठा काळसूर कौढर संघ विजेता

rat२८२५.txt

बातमी क्र..२५ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
rat२८p२७.jpg ः

..................
91928
गुहागर ः मराठा प्रीमियर लीग स्पर्धेतील विजेता वीर मराठा काळसूर कौढर संघ.
----------------
वीर मराठा काळसूर कौढर संघ विजेता

गुहागर क्षत्रिय मराठा प्रीमियर लिग; सिद्धिविनायक वरवेली उपविजेता

गुहागर, ता. २८ ः गुहागर क्षत्रिय मराठा युवा संघटनेतर्फे आयोजित मराठा प्रीमियर लीग-२०२३ क्रिकेट स्पर्धेत वीर मराठा काळसूर कौढर संघाने सिद्धिविनायक वरवेली संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला होता. पुढील वर्षी प्रत्येक तालुक्यात अशी स्पर्धा भरवण्याचा मनोदय सुधीर भोसले यांनी व्यक्त केला.
शृंगारतळीतील जानवळे फाटा येथील गोल्डन व्ह्यू मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक मराठा समाजाचे दिग्गज नेते, सेलिब्रिटी यांनी उपस्थिती लावली होती. अंतिम सामना वीर मराठा काळसूर कौंढर व सिद्धिविनायक वरवेली यांच्यात झाला. यामध्ये सर्व्हेश साळवीने धुवाँधार फलंदाजी करत वीर मराठा काळसूर कौढर संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेत एकूण २० संघमालक आणि ३५० खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आला. अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ म्हणून सर्वेश साळवी, तर ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ सूरज शिंदे, ‘उत्कृष्ट फलंदाज’ सर्वेश साळवी, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ प्रकाश साळवी, ‘मॅन ऑफ दी सीरिज’ विराज विचारे यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस समारंभप्रसंगी माजी खासदार नीलेश राणे, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, सुधीर भोसले, क्षत्रिय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी, अमिष कदम, अजय खाडे, प्रकाश शिर्के, भगवान कदम, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com