समाजाभिमुख राहून विद्यार्थी घडवा

समाजाभिमुख राहून विद्यार्थी घडवा

91931
बांदा ः पुरस्कार प्राप्त शिक्षक, कर्मचाऱ्यांसोबत संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, कल्पना तोरसकर, रश्मी तोरसकर आदी.

समाजाभिमुख राहून विद्यार्थी घडवा

बी. एन. तेली; बांद्यात पुरस्कार वितरण सोहळा

बांदा, ता. २८ ः शिक्षकाने आताच्या काळात स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण समाधानकारकरित्या करू शकाल. नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षक व शिक्षण संस्थांनी समाजाभिमुख होऊन आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक बी. एन. तेली यांनी येथे केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा येथील खेमराज प्रशालेच्या व्यासपीठावर झाला. आदर्श काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक आणि शाळा यांचा संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी गुरुवर्य व्ही. एन. नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संस्थेच्या भेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, आदर्श शिक्षक पुरस्कार सुहास वराडकर (मडुरा हायस्कूल), आदर्श लिपिक पुरस्कार भिवा जाधव (बांदा हायस्कूल), आदर्श सेवक पुरस्कार संजय बांदेकर (परेल हायस्कूल) आणि आदर्श शाळा पुरस्कार शिवछत्रपती मध्यामिक विद्यालय असनिये हायस्कूल यांना देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्था सचिव कल्पना तोरसकर, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर खान, मेजर देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असताना संस्था कायम तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. तोरसकर यांनी दिले. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त असनिये हायस्कूलचे मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी संस्थेचा सेवक ही भावना मनात ठेवून विद्यार्थी व शाळेच्या हितासाठी उत्साहाने सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेल्या मेजर देसाई यांनीही अनुभव व्यक्त केले. रश्मी नाईक, रणवीर रणसिंग यांनी सूत्रसंचालन केले. बांदा हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक नंदकिशोर नाईक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com