कॉलेजचे नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

कॉलेजचे नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

(टीप- जाहिरातदार आहेत. बातमी आवश्यक)

जगद्‍गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या

कॉलेजचे उद्या गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी, ता. २८ ः श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्‍गुरू नरेंद्रचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी (ता.३०) केंद्रीय रस्ते, परिवहन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
जगद्‍गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री गडकरी व पालकमंत्री सामंत यांचे सुंदरगडावर आगमन होईल. त्यानंतर त्यांच्या हस्ते जगद्‍गुरू नरेंद्रचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी जगद्‍गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन सोहळ्यानंतर मंत्री गडकरी यांचे संतपीठावर आगमन होईल. ते श्रीराम नवमी उत्सव सोहळ्यात काही काळ सहभागी होतील. यावेळी संस्थानतर्फे गडकरी व सामंत यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. येथील जगद्‍गुरू नरेंद्रचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये परिसरातील गोरगरीब मुलांना इंग्रजी माध्यमाचे मोफत शिक्षण दिले जाते. आता तेथे इंग्रजी माध्यमाचे १२ वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. पुढील कॉलेज शिक्षणासाठी इमारतीची आवश्यकता होती. येथील बारावीचा निकाल सलग तीन वर्षे शंभर टक्के लागला आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या इन्स्टिट्यूटचा लौकिक दिवसेंदिवस वाढतो आहे. दरम्यान, वारी उत्सव सोहळ्यासाठी भाविक सुंदरगडावर येण्यास सुरुवात झाली आहे.
.........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com