रत्नागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी

sakal_logo
By

rat२८p३१.jpg-
९१९४६
मंडणगड ः शहर व्यापारी संघटनेने जमवलेली मदत जीवावरा चौधरी यांना देताना अध्यक्ष प्रमोद काटकर, दीपक घोसाळकर व अन्य.
--
व्यापारी जीवाराम चौधरींना व्यापारी संघटनेकडून मदत

मंडणगड ः शॉर्टसर्किटने आग लागल्याने शहरातील आशापुरा स्वीट्स ही बेकरी पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये बेकरीचे मालक जीवाराम चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांच्यावर ओढवलेले संकट लक्षात घेऊन मंडणगड शहर व्यापारी संघटनेने २४ मार्च २०२३ ला मंडणगड शहर व परिसरात मदतफेरी काढली. या वेळी शहरातील व्यापाऱ्यांनी दिलेले २७ हजार ५०० रुपयांची मदत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, दीपक घोसाळकर, श्रीपाद कोकाटे, कौस्तुभ जोशी, नीलेश गोवळे, राजेश पारेख यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव उपस्थित होते.
-