आचरा रामेश्वर मंदिरात
आज रामनवमी उत्सव

आचरा रामेश्वर मंदिरात आज रामनवमी उत्सव

92264
आचरा ः पालखीत विराजमान श्री विष्णूची मूर्ती.

आचरा रामेश्वर मंदिरात
आज रामनवमी उत्सव
आचरा, ता. २९ ः येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव उद्या (ता. ३०) शाही थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. ३०) रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे कीर्तन मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत. सायंकाळी साडेपाचला व शुक्रवारी (ता. ३१) सकाळी दहाला निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन, शनिवारी (ता. १) रात्री साडेनऊला विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, आचरा यांचा ‘आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग’ हा कार्यक्रम होणार आहे. कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे, विजय कदम यांचा सहभाग असणार आहे. बुधवारी (ता. ५) रात्री अकराला हनुमान जयंतीनिमित्त श्री रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसो चांगलो’ होणार आहे. गुरुवारी (ता. ६) हनुमान जयंती, पहाटे पालखीनंतर श्री हनुमान जन्माचे कीर्तन बुवा मिलिंद बुवा कुळकर्णी सादर करणार आहेत. सहभागाचे आवाहन अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com