दाभिळ पूलही वाहतुकीस खुला

दाभिळ पूलही वाहतुकीस खुला

rat29p28.jpg
92306
खेडः महामार्गावरील रखडलेला दाभिळ पूल वाहतुकीस खुला.
--------
दाभिळ पूलही वाहतुकीस खुला
खेडः मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या दाभिळ पुलाचे कामदेखील पूर्ण झाले असून, या पुलावरून वाहतूकही खुली झाली आहे. चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडच्या कामांनीही वेग घेतला आहे. काही सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू झाल्याने पादचारी वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई-गोवा महामार्गात खवटी ते परशुराम घाटापर्यंत चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले आहे. प्रथम कंपनीने भोस्ते घाटातील चौपदरीकरणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. परशुराम घाट वगळता सद्यःस्थितीत खवटीपासून लोटेपर्यंत काम पूर्ण झाले; मात्र भोस्ते, लवेल, दाभिळ येथे पूल उभारण्याचे प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आल्याने येथील चौपदरीकरण रखडले होते. भरणे उड्डाणपुलासह जोडपुलाचे कामही पूर्ण झाले असून, हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
--
rat29p27.jpg
92305
खेडः दिव्यांग जिल्हा कबड्डी संघाचा कर्णधार रोहित शितब.
----------
दिव्यांग कबड्डी संघाच्या
कर्णधारपदी रोहित शितब
खेडः गुरूवर्य श्री. ग. रा. चिकणे गुरूजी प्रतिष्ठान खेड व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्यावतीने पॅरा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने (कै.) किशोर कानडे क्रीडांगण खेड येथे दिव्यांग कबड्डी खेळाडूंच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेकरिता दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची निवड आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत, अध्यक्ष दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीच्यावतीने करण्यात आली. जिल्हासंघाच्या कर्णधारपदी रोहित शितब, उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. दीपक फुटक, खेळाडू सागर आईनकर, संजीव पोढकर, अल्पेश तावडे, प्रवीण साबळे, भरत घेवडे, आरुष चोंणकर, राहुल बरे, संघ व्यवस्थापक जनार्धन पवार, प्रशिक्षक राकेश बैकर यांची निवड केली आहे. हा दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
-------------
rat28p26.jpg
92304
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्मवीर दादा इदाते यांना पद्मश्री प्रदान करताना.

दादा इदाते यांना पद्मश्री प्रदान
दाभोळः कोकणवासीयांची शान, दापोली तालुक्याची मान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशात डौलाने फडकवणारे कर्मवीर दादा इदाते यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यानंतर पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचे दापोलीत आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. इदाते यांचे दापोली शहरात आगमन झाल्यावर दापोली पोलिस ठाणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर दापोली पोलिस ठाणे-बाजारपेठ- पोस्टाची गल्लीमार्गे एक रॅली काढण्यात आली. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनातून दापोलीकर सहभागी झाले होते. दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने दापोलीकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com