सौंदर्यीकरणात ''वेंगुर्ले'' अव्वल ठरेल

सौंदर्यीकरणात ''वेंगुर्ले'' अव्वल ठरेल

swt३०२५.jpg
९२४९६
वेंगुर्लेः येथे आयोजित स्वच्छोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ. सोबत माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सचिन वालावलकर, सुहास गवंडळकर व इतर मान्यवर.

सौंदर्यीकरणात ‘वेंगुर्ले’ अव्वल ठरेल
परितोष कंकाळः ‘वेंगुर्ला स्वछोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३०ः स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकले आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून आपण पर्यावरण संवर्धन व संरक्षणाकरिता कांदळवन व विविध ठिकाणी स्वछता मोहीम, जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत. स्वच्छतेसोबत शहर सुंदर असावे, या अनुषंगाने राज्याने राबविवेल्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये पूर्ण क्षमतेने आपले शहर उतरले आहे. निश्चितच हा मानाचा पुरस्कार वेंगुर्ला शहर पटकावले यात दुमत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतोत्सव कार्यक्रमात व्यक्त केली.
येथील पालिकेच्यावतीने कॅम्प त्रिवेणी गार्डनमध्ये आयोजित केलेल्या एकदिवशीय ‘वेंगुर्ला स्वछोत्सव २०२३’ ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाची सुरुवात बालोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धेने झाली. ५ ते १० वी शालेय गट, पुरुष खुला गट व महिला खुला गट या ३ गटात घेण्यात आलेल्या स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धेसाठी माझे शहर, माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त माझे शहर व स्वच्छतेचा बालमहोत्सव असे विषय देण्यात आले होते. महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व साजरे करणे या उद्देशाने महिला बचतगटांमार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्व खाद्य पदार्थ खवय्यांना केळीच्या पानात दिले गेले. यानंतर स्वच्छोत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश येरम, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, पूजा कर्पे, सुनील नांदोस्कर, प्राध्यापक आनंद बांदेकर, प्राध्यापक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व याला प्रोत्साहन देणे, झिरो वेस्ट व स्वच्छता विषयक जनजागृती करणे, लहान मुलांमध्ये स्वछतेची मूल्ये रुजवणे कारण ही पिढी पुढे जाऊन स्वछतेचा वसा टिकवून ठेवणार आहे. अशा प्रमुख उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी मुख्याधिकारि कंकाळ यांनी सांगितले. यानंतर याठिकाणी स्वच्छता विषयक पथनाट्य, नृत्य आणि समूहगीताते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. या महोत्सवात पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बॅनरऐवजी कापडी तसेच फॅब्रिकचे बॅनर लावले होते. स्वच्छोत्सवाचे वाळू शिल्प सुद्धा रेखाटण्यात आले होते.

चौकट
पर्यटन महोत्सवास सहकार्य करुः गिरप
स्वच्छत्सवसारखा स्तुत्य उपक्रम नगरपरिषदेने घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा कार्यकाळ संपून आज जवळजवळ सव्वा वर्ष होऊन गेले. मात्र, जरी लोकप्रतिनिधी नसले तरी गेल्या ५ वर्षात आम्ही जी कामे केली होती ती चांगल्याप्रकारे टिकवून ठेवण्याचे काम आज मुख्याधिकारी कंकाळ करत आहेत याबाबत समाधान वाटते. लोकांचा या स्वच्छतोत्सवला प्रतिसाद पाहता जरी आज नगरपरिषदमध्ये कार्यकारणी नसली तरी पर्यटन महोत्सव घेण्याचे नियोजन त्यांनी करावे, यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य राहील, असे यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com