मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा जामसंडे येथे उत्साहात

मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा जामसंडे येथे उत्साहात

swt3029.jpg
92509
जामसंडेः कावलेवाडी येथील मंदिरात नंदकुमार घाटे, संजय पाटणकर यांच्या उपस्थितीत श्री गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. (छायाचित्रः संतोष कुळकर्णी)

मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा
जामसंडे येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३१ः जामसंडे कावलेवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज श्री रामनवमी आणि श्री दत्तमूर्ती वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. श्री दत्त मंदिर शांतीदरबार ग्रामस्थ व महिला मंडळ आणि कावलेवाडी विकास मंडळ (मुंबई) यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिरात विधीवत पूजा करून श्री गगनगिरी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उद्योगपती घाटे यांच्यासह किल्ले गगनगड येथील संजय पाटणकर, बापूसाहेब पाटणकर, बबन बापू महाराज (आश्रम करगणी आटपाटी), उल्हासगिरी महाराज (आश्रम ओणी राजापूर), सदानंदगिरी महाराज (आश्रम बुरंबाळी राधानगरी), दीपक महाराज, राजाराम परब (इळये पाटथर) तसेच विनायक कावले उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com