-राजापुरात चौपदरीकरणाचे काम अर्धवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-राजापुरात चौपदरीकरणाचे काम अर्धवट
-राजापुरात चौपदरीकरणाचे काम अर्धवट

-राजापुरात चौपदरीकरणाचे काम अर्धवट

sakal_logo
By

-rat३१p६.jpg ः

९२६११
राजापूर ः केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अरविंद लांजेकर.
-

राजापुरात चौपदरीकरणाचे काम अर्धवट

भाजयुमोचे मंत्री गडकरींना निवेदन ; घरी जाणाऱ्या पायवाटाही बंद

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यामध्ये सुरू असलेले बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी अद्यापही शहरातील एसटी डेपोसमोरील काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. अनेक ठिकाणच्या एसटी थांब्याच्या ठिकाणी प्रवाशी शेड उभारणी प्रलंबित राहिलेले आहे. शेतांसह अनेकांच्या घरी जाणाऱ्‍या पायवाटा महामार्गाच्या कामामुळे बंद झालेल्या आहेत. अर्धवट आणि प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे तालुक्यामध्ये चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी कोकण दौऱ्‍यावर आले आहेत. या वेळी लांजेकर यांनी भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून त्यांची भेट घेऊन तालुक्यातील महार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रलंबित असलेल्या कामाकडे त्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. एसटी डेपोसमोरील काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्याचबरोबर पेट्रोलपंप, कोदवली, वाटूळ, शासकीय विश्रामगृह, हतिवले टोलनाकानजीक, कोंढेतड गाडगीळवाडी, डोंगरफाटा जंक्शन, कोंड्येतर्फ सौंदळ, शेजवली फाटा आदी ठिकाणचे चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे.
गावोगावच्या एसटी थांब्याच्या येथील प्रवाशीशेडही उभारण्यात आले नसून वाडीवस्तीवर जाणारे रस्ते आणि पायवाटाही बंद झालेल्या आहेत. या साऱ्‍या बाबींकडे बांधकाम प्रशासनासह ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे लांजेकर यांनी म्हटले आहे. चौपदरीकरणाची प्रलंबित असलेली ही कामे मार्गी लागावीत, अशी अपेक्षा लांजेकर यांनी व्यक्त केली.
-
टोलमाफीची मागणी

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. राजापूर शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी तालुक्याची प्रमुख विविध शासकीय कार्यालयांसह हॉस्पिटल असल्याने लोकांची दैनंदिन कामांसह अन्य शासकीय कामांसाठी नियमित शहरामध्ये ये-जा असते. दिवसभरातील शहरातील ही ये-जा टोलनाक्याच्या येथून केली जाते. त्यामुळे टोलनाक्याच्या येथील ३० कि.मी. परिसरातील स्थानिक वाहनांना टोलवसुलीमधून सूट मिळावी, अशी मागणी तालुकावासीयांकडून करण्यात आली आहे. राजापूरवासीयांची टोलवसुलीमध्ये सवलत मिळावी ही रास्त असलेली मागणी टोलवसुलीविरोधी समितीच्या वतीने लांजेकर यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे.