पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा 
ओरोसला संघटनेतर्फे सत्कार

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा ओरोसला संघटनेतर्फे सत्कार

92853
ओरोस ः राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना गौरविताना मान्यवर. (छायाचित्र : एन. पावसकर)

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा
ओरोसला संघटनेतर्फे सत्कार
तळेरे : राष्ट्रीय-राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखेकडून २०२२-२०२३ च्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रघुनाथ (नंदन) घोगळे व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्नेहलता राणे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. संघटनेचे निवृत्त सदस्य राजाराम बिडकर व औदुंबर भागवत यांनाही सन्मानित करण्यात आले. ओरोस येथे हा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, विभागीय कार्याध्यक्ष आनंद जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष जयदेव सारंग, जिल्हा कोषाध्यक्ष उदय गोसावी, प्रसिद्धी प्रमुख शामसुंदर सावंत, प्राध्यापक जगदीश राणे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सावंत यांनी स्वागत केले. दशरथ शृंगारे यांनी प्रास्ताविक केले. शामसुंदर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. जयदेव सारंग यांनी आभार मानले.
................
सावंतवाडीत शवपेटीचे लोकार्पण
ओटवणे ः ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या सौजन्याने जनसेवार्थ उपलब्ध केलेल्या शवपेटीचा लोकार्पण कार्यक्रम आज सावंतवाडी-शिरोडा नाका येथील कार्यालयात पार पडला. याप्रसंगी डॉ. संदीप सावंत, डॉ. दीपक लादे, डॉ. निखिल अवधूत, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत सापळे, डॉ. दत्तप्रसाद पावसकर आदींसह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बळवंत मसुरकर, उपाध्यक्ष बी. एन. तेली, सचिव प्रकाश राऊळ, सहसचिव सुधीर धुमे, खजिनदार अरुण मिस्त्री, सदस्य प्रा. सुभाष गोवेकर, अनंत माधव, नारायण मालवणकर, सीमा नाईक, सुलभा टोपले, शिवाजी आळवे, गुरुदास पेडणेकर, हणमंत देसाई, रुपाली मुद्राळे, अर्चना वझे, ''सामाजिक बांधिलकी''चे रवी जाधव, समीरा खलील आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संघाचे सल्लागार हणमंत देसाई यांचे जावई अशोक पाटील, मुलगी रोहिणी पाटील यांचा हातभार लाभला. रुपाली मुद्राळे, अरुण मिस्त्री व प्रकाश राऊळ यांच्याकडे या सेवेची जबाबदारी सोपविण्यात आली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. वजराटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून असे सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com