ठाकरे गटातील 13 आमदार आमच्या संपर्कात

ठाकरे गटातील 13 आमदार आमच्या संपर्कात

ठाकरे गटातील १३ आमदार संपर्कात
उदय सामंतांचा गौप्यस्फोट; सावरकर गौरवयात्रा काढणारच
रत्नागिरी, ता. १ः ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे उद्योगमंत्री आणि उपनेते उदय सामंत यांनी केला. शिंदे गटातील २८ आमदार भाजपमध्ये जाणार, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना सामंत यांनी हे स्पष्ट केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागाही शिवसेना लढणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी राजकीय विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील ४० आमदारांबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, आगामी काळात ४० पैकी २८ आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. याला प्रत्यूत्तर देताना सामंत म्हणाले, खासदार संजय राऊत म्हणजे सकाळी नऊचे बातमीपत्र आहे. आमचे २८ सोडा, ठाकरे गटातील राहिलेले १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते काही म्हणतील असे चालणार नाही. महाविकास आघाडीने सभा घेतली की, त्याला उत्तर दिलेच पाहिजे, असे काही नाही.
देशात सावरकरांवरून वाद सुरू आहेत. यात गौरवयात्रा काढणे योग्य आहे का? यावर सामंत म्हणाले, आम्ही सावरकरांचा इतिहास लोकांपुढे ठेवण्यासाठी गौवरयात्रेचे नियोजन केले आहे आणि ती काढणार आहोत.

कोट
आम्ही खेडमधील विक्रमी सभा दाखवून दिली आहे. भाजप-शिवसेनेची सभा झाली तर अनेक विक्रम मोडेल. तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पाहिल्या तरी राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची भाषणे विधायक आणि विकासकामांवर आहेत; परंतु ठाकरे सेनेची भाषणे एककलमी शिंदे गटावर खोके घेतल्याचे आरोप करणारी आहेत; पण महापालिकेत किती खोकी घेतली हे बोलणारे आमच्याकडेपण आहेत; परंतु राजकारणातील आचारसंहिता आम्ही पाळतो.
- उदय सामंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com