विजयदुर्गमध्ये ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’

विजयदुर्गमध्ये ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’

93091
विजयदुर्ग ः येथे पर्यटकांच्या सोयीसाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ व्यवस्था सुरू करण्यात आली.


विजयदुर्गमध्ये ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’

पर्यटकांसाठी सुविधा; मेरीटाईम, प्रेरणोत्सव समितीचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सौजन्याने आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ले विजयदुर्गला भेट देणाऱया पर्यटकांच्या सोयीसाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या व्यवस्थेचे उद्‍घाटन कोल्हापूर येथील सागर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटकांच्या पार्किंग व्यवस्थेमधून मिळणारा पैसा स्थानिक पर्यटन सुविधेसाठी वापरला जाणार असल्याचे प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी यावेळी सांगितले.
विजयदुर्गमध्ये पर्यटक संख्या वाढत असल्याने पर्यटकांना वाढीव सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वाहन पार्किंग व्यवस्था सुरळीत करून गैरसोय टाळण्यासाठी किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या पार्किंग व्यवस्थेमधून मिळणारा पैसा त्यांच्या पर्यटन सुविधेसाठी वापरला जाणार असल्याचे प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष देवधर यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महिला व पुरुषांसाठी किल्ल्याच्या पायथ्याशी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता पार्कींग सुविधा निर्माण करण्यात आली. याच्या उद्‍घाटनावेळी प्रभारी सरपंच रियाज काझी, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर, अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, प्रेरणोत्सव समिती सदस्य संजय सावंत, प्रदीप मिठबावकर, प्रदीप साखरकर, यशपाल जैतापकर, रविकांत राणे आदी समितीचे सदस्य तसेच दिनेश जावकर, केतन घरकर, स्टिफन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
--
किल्ल्याच्या पायथ्याशी विसावा केंद्र
सद्यस्थितीत ज्येष्ठ पर्यटकांना विसावा घेण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिराजवळ पर्यटक विसावा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शौचालय, स्नानगृह, पाण्याची व्यवस्था, आराम खुर्ची, पंखे आदी सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यात या विसावा केंद्रामध्ये कोकणची संस्कृती, किल्ल्याचा इतिहास आदींच्या ध्वनीफित दाखविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com