दाभोली उपसरपंचासह सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत

दाभोली उपसरपंचासह सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत

swt38.jpg
93223
सावंतवाडी : दाभोली उपसरपंच व सदस्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दाभोली उपसरपंच यांच्यासह
सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः दाभोली (ता. वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वेंगुर्लेत उध्दव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
शिक्षणमंत्री केसरकर यांच्या येथील संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी दाभोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य सिसीलिया मास्करेनास, एकनाथ राऊत, नरेश बोवलेकर, तमास डिसोझा व जॉन मेंडोसा, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सचिन वालावलकर, माजी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, कोचरा सरपंच योगेश तेली, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते. दाभोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटनवाढीसाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन दाभोलीचा विकास केला जाईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली. सचिन वालावलकर यांनी स्वागत केले. आभार नितीन मांजरेकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com