फिनोलेक्सची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद

फिनोलेक्सची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद

- rat६p९.jpg-
९३९४०
राजापूर ः रूग्णांना किटचे वाटप करताना अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, डॉ. सुर्यवंशी, फिनोलेक्सचे व्यवस्थापक संदीप गोगले, अभिषेक साळवी, डॉ. मंगला चव्हाण.

फिनोलेक्सची सामाजिक बांधिलकी कौतुकास्‍पद

डॉ. महेंद्र गावडे ः राजापूरात क्षय रूग्णांना आहाराचे किट वाटप

राजापूर, ता. ६ ः मुकूल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून दाखवलेली सामाजिक बांधिलकी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. समाजातील अशा दातृत्वामुळे ‘क्षयरोग मुक्त भारत’ होण्यास निश्‍चितच सकारात्मक पाठबळ मिळेल, अशा शब्दात अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी कौतुकोद्गार काढले. सर्व रूग्णांनी वेळेत औषधोपचार आणि आहार घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.
क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गंत मुकूल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र यांच्यावतीने तालुक्यातील रूग्णांना आहार साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये झालेल्या या कार्यक्रवेळी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी, फिनोलेक्सचे व्यवस्थापक संदीप गोगले, अभिषेक साळवी, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंगला चव्हाण, धारतळे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील परांजपे, तालुका आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक श्री. तावडे, आरोग्य सहाय्यक श्री. धानबा, आचल मेळेकर, राजेश गेल्ये, श्री. कागले, श्री. कोकणे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुर्यवंशी यांनी रूग्णांना औषधोपचार आणि आहारासंबंधित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. परांजपे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com