किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापनदिन मालवणात उत्साहात साजरा

किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापनदिन मालवणात उत्साहात साजरा

swt621.jpg
94013
मालवणीः प्रेरणोत्सव समिती पदाधिकारी, शिवप्रेमींनी शिवराजेश्वर मंदिरात महाराजांचे दर्शन घेतले.

किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापनदिन
मालवणात उत्साहात साजरा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापनदिन आज प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग येथे भूषण साटम यांनी कवी भूषण यांचे छत्रपती शिवरायांवर आधारित काव्याचे केलेले सादरीकरण, मर्दानी खेळ सर्वांचेच आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ला परिसर दुमदुमला.
किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते मोरयाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणोत्सव समिती पदाधिकारी, शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यात आले. यानंतर न्यू छत्रपती ब्रिगेडच्या सदस्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. भूषण साटम यांनी शिवरायांवर आधारित कवी भूषण यांच्या काव्याचे सादरीकरण केले. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, गणेश कुशे, रविकिरण तोरसकर, दत्तात्रय नेरकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, मिलिंद झाड, प्रदीप वेंगुर्लेकर, तृप्ती मयेकर, ललित चव्हाण, रविकिरण आपटे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com