चिपळूण अर्बनला 7 कोटी 33 लाखांचा नफा

चिपळूण अर्बनला 7 कोटी 33 लाखांचा नफा

चिपळूण अर्बनला ७ कोटी ३३ लाखांचा नफा

निहार गुडेकर ; शुन्य टक्के एनपीए राखण्यात यश

चिपळूण, ता. ६ ः दि चिपळूण अर्बन को-ऑप बँकेला ३१ मार्च २०१३ च्या आर्थिक वर्षात ७ कोटी ३३ लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. शासकीय लेखापरीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक या तरतुदी करणेत आल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष निहार गुडेकर यांनी दिली.
बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून २१ शाखा, ११ एटीएमद्वार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्हयामध्ये कामकाज करत आहे. कोकणातील अग्रगण्य बँक व विश्वासास पुर्ण उतरणारी बँक असा नावलौकीक बँकेने प्राप्त केला आहे. धनेन जनहित कार्यम या बँकेच्या ब्रीद वाक्यानुसार बँक सर्वसामान्यांपर्यंत आपली सेवा देत आहे. मार्च २०१३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी २६४.८५ कोटी तर कर्ज पुरवठा १४८.०३ कोटी इतका झाला आहे. बँकेचा ढोबळ केवळ ३.९३ टक्के इतका असून एनपीए शुन्य टक्के बँकेने राखण्यात यश मिळवले आहे.
बँकेच्या आरवली शाखेने थकबाकी शून्य टक्के राखली आहे. तसेच गुहागर व आरवली या शाखांनी देखील शून्य टक्के एनपीए राखला आहे. यावर्षी बँकेच्या पनवेल, कुवारबाव, महाड व आरवली शाखा सोडून इतर सर्व शाखा स्वबळावर नफ्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेचे सुधारित धोरणानुसार सोने तारण कर्जाचे (शेती पुरक क्षेत्र सोडून) मासिक कर्जदारांनी भरणा करणे आवश्यक असल्याने बँकेचे वतीने सोने तारण कर्ज ग्राहकांना व्याज भरणा करणेचे आवाहन करणेत आले होते. त्याला प्रतिसाद देऊन ग्राहकांनी व्याज व थकीत हप्ते वेळेत भरणा करून सहकार्य केले आहे.
बँकेने व्यापारी व ग्राहकाकरीता गोल्ड ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना सुरू केली असून, त्यास चांगला प्रतिसाद आहे. २५ लाख पर्यंतचा कर्ज पुरवठा दृष्टीने २४ तासात मंजुरी देणेत येईल. यामध्ये वाहन कर्ज, गृह कर्ज, व्यापारी वर्गाकरीता असलेल्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. सर्व योजनेचा लाभ बँकेच्या सभासद खातेदार ग्राहक यांनी घ्यावा असे आवाहन निहार गुढेकर यांनी केले आहे.
-
ट्रस्टच्या ठेवींना अतिरिक्त व्याज
भविष्यात मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, युपीआय, क्यूआर कोडच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा चालू करणार आहे. नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान, शैक्षणिक ट्रस्ट यांना सामाजिक बांधिलकीचा विचार करता या संस्थांच्या नवीन जमा होणाऱ्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य व्याजदरापेक्षा ०.२५ टक्के अतिरिक्त व्याजदर बँकेने लागू केला आहे, अशी माहिती गुढेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com