दाभोळ-संक्षिप्त

दाभोळ-संक्षिप्त

पान २ साठी, संक्षिप्त)

९४६८१

अभिवादन यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बैठक
दाभोळ ः कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅ. नाथ पै, मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित यात्रेनिमित्त आमदार कपिल पाटील दापोलीमध्ये येणार आहेत. जनता दलाच्या (युनायटेड) वतीने कोकणात आयोजित येणाऱ्या या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी दापोलीमध्ये बैठक झाली. त्यात जदयु नेते हिराजी पाटील, राजा कांदळकर, सचिन बनसोडे, शिक्षक नेते मुबिन बामणे यांनी मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस कोकण रेल्वेचे आणि त्यामुळे झालेल्या कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. नाथ पै आणि मधू दंडवते यांचं यंदा जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यानिमित्ताने या तिघांना अभिवादन करण्यासाठी जनता दल (युनाइटेड) च्या वतीने अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कोकण विकासाचे मॉडेल मांडणे, कोकणचे प्रश्न, पर्यावरण, बेरोजगारीचं संकट समजून घेणे, समाजवादी विचारांच्या लोकांना एकत्र करणे आणि त्यातून जनता परिवाराचे पुनर्गठन करणे असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती बैठकीत दिली.

९४६८२
उद्योजक पवारांवर शुभेच्छाचा वर्षाव
सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील प्रसिद्ध उद्योजक केतन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या केबी पवार कार्यालयात हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. केतन पवार यांना गोवा राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. होते. सावर्डे येथील प्रसिद्ध यंग बॉईज क्रिकेट संघाचे अध्यक्ष असून क्रीडा, सामाजिक क्षेत्रात चांगले काम असून परिसरातील गरजूंना व क्रीडा क्षेत्रात मदतीचे काम करीत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम, महाराष्ट कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, साजन कुरुसिंगल, उद्योजक सचिन पाकळे, शिक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष सतीश सावर्डेकर आदी उपस्थित होते.

रिक्षा थांब्याच्या फलकाचे आज अनावरण
रत्नागिरी : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जयस्तंभ येथे सोमवारी (ता. १०) रिक्षा थांबा फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. स्वाभिमान रिक्षा चालक- मालक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर यांनी हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. त्यानंतर शहरातील विविध स्टॉपवर रिक्षा व्यावसायिकांना लाडूचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, सभासद, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com