रत्नागिरी- रत्नागिरीच्या चित्रकारांचे नेहरू आर्ट गॅलरीत कलाप्रदर्शन

रत्नागिरी- रत्नागिरीच्या चित्रकारांचे नेहरू आर्ट गॅलरीत कलाप्रदर्शन

फोटो ओळी
-rat11p20.jpg ःKOP23L95040 चित्रकार नीलेश पावसकर, निखिल कांबळे, सचिन पेडणेकर, मोनिका खटाळे.
-rat11p9.jpgKOP23L95001- रत्नागिरी ः कोकणचे निसर्गसौंदर्य दाखवणारी चित्रे नेहरू आर्ट गॅलरीत झळकणार.
--------------
रत्नागिरीच्या चित्रकारांचे नेहरू आर्ट गॅलरीत कलाप्रदर्शन

नीलेश पावसकर ; निखिल कांबळे यांची लक्ष्यवेधी चित्रे

रत्नागिरी, ता. 11 ः निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसह कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि कोकणच्या ग्रामीण भागातील असामान्य चैतन्याचा शोध, ग्राम्यजीवनावरील बोलकी, लक्ष्यवेधी चित्रे वरळी, मुंबईच्या डॉ. अॅनी बेझंट रोडवरील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत झळकणार आहेत. रत्नागिरीतील चित्रकार नीलेश पावसकर आणि निखिल कांबळे यांनी ही चित्रे साकारली आहेत.
या प्रदर्शनात प्रत्येकी 25 ते 30 चित्रे झळकणार आहेत. कॅन्व्हासवर जलरंगात ही चित्रे दोन बाय चार फूट आकारात आहेत. त्यांच्यासोबत मोनाली खटाळे आणि सचिन पेडणेकर यांनी चितारलेली चित्रेही यात पाहायला मिळतील. येत्या 18 ते 24 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायं. 7 वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाचे उद्गाटन अभिनेत्री वीणा जामकर करणार आहेत.
पावसकर हे गेली 15 ते 20 वर्षे चित्रकारिता करत आहेत. सागरी किनाऱ्यांवरील निसर्गसौंदर्याचे अतिसूक्ष्म चित्रांकन ते करतात. कुशल कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अद्भुत सौंदर्यात प्रतिबिंबित होणारी अपूर्व मनशांतीही या चित्रांमध्ये मिळते, असे जाणकार सांगतात. पावसकर हे फाटक प्रशालेत कलाशिक्षक असून, त्यांचे पंचवीसहून अधिक विद्यार्थी चित्रकलेच्या विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. शाळेत चित्रकला शिकवण्यासह विद्यार्थ्यांकरिता ते भ्रमंती रंगांची हा अनोखा उपक्रम 2012 पासून राबवत आहेत. त्यांना यापूर्वी कलाध्यापक संघाच्या लॅंडस्केप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. आर्ट व्हिजनतर्फे राजा रविवर्मा पुरस्कार आणि आर्ट क्रीएशनतर्फे राष्ट्रीय ऑनलाइन लॅंडस्केप स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. यापूर्वी त्यांची चित्रे आर्ट सर्कल कला महोत्सव, कोल्हापूर महोत्सव, रंग तरंग ग्रुप शो, थिबा महोत्सव, आर्ट व्हिजन प्रदर्शनात झळकली आहेत.
दुसरे चित्रकार निखिल कांबळे हे ग्लोबल स्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. त्यांच्या चित्रांत कोकणचा निसर्ग सर्वाधिक पाहायला मिळतो. त्यांना मुद्रा कला निकेतनच्या लॅंडस्केप स्पर्धेत चारवेळा पारितोषिके मिळाली आहेत. रांगोळी स्पर्धेतही त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत. कांगारूज ऑल इंडिया आर्ट कॉम्पिटिशनमध्ये त्यांना कलामित्र पुरस्कार आणि रंगोत्सव राष्ट्रीय कला प्रदर्शनात कलागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
------------
चौकट 1
नामवंत चित्रकार
मुंबईचे सचिन पेडणेकर हे नामवंत चित्रकार असून, अनेक प्रदर्शनांत भाग घेतला आहे. नाशिकच्या मोनिका खटाळे या जीडी आर्ट असून राजा रविवर्मा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. आतापर्यंत 10 हून अधिक चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे झळकली आहेत. त्यांची चित्रशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे.

- बातमीदार- मकरंद पटवर्धन.... 11.4.2023

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com