जिल्हा वक्तृत्व स्पर्धेत हरकुळकर, जोशी प्रथम

जिल्हा वक्तृत्व स्पर्धेत हरकुळकर, जोशी प्रथम

swt११२५.jpg
९५१०४
वेंगुर्लेः विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

जिल्हा वक्तृत्व स्पर्धेत
हरकुळकर, जोशी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ११ः भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात गायत्री जोशी, तर मोठ्या गटात संस्कृती हरकुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अॅड. सत्यवान चेंदवणकर, धम्मपिठाचे संस्कार विभाग उपाध्यक्ष राघोजी चेंदवणकर, महिला विभाग उपाध्यक्षा सुषमा हरकुळकर, संरक्षण विभाग उपाध्यक्ष अशोक कदम, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विदिशा जाधव, सचिव राकेश वराडकर, तालुका कोषाध्यक्ष रामचंद्र जाधव, केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर उपस्थित होते. स्पर्धेत लहान गटामध्ये गायत्री जोशी (पाट), विनित परब (कुडाळ), दीक्षिता मातोंडकर (मातोंड), तर मोठ्या गटात संस्कृती हरकुळकर (कणकवली), श्रद्धा नेमण (मातोंड), श्रावणी धुरी (मठ) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. लहान गटाचे परीक्षण सुंदर म्हापणकर व सीमा मराठे यांनी, मोठ्या गटाचे परीक्षण प्रा. नंदगिरीकर व वीरधवल परब यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संचिता जाधव, अनिकेत कांबळे, अनिल जाधव, सुनील जाधव यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com