आठवडा बाजाराबाबत पालकमंत्र्यांना साकड़े

आठवडा बाजाराबाबत पालकमंत्र्यांना साकड़े

swt११४३.jpg
L९५१६८
सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना हॉकर्स फेडरेशनचे पदाधिकारी.

आठवडा बाजाराबाबत पालकमंत्र्यांना साकड़े
सावंतवाडीत ''हॉकर्स''चे निवेदनः जागा उपलब्धतेपर्यंत स्थलांतर नको
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.११ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजारासाठी सुचविलेली जागा चुकीची आहे. त्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे गर्दी होऊन चोरी किंवा महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार होऊ शकतात. चार वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरविल्यास त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागेल. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तलावाकाठी भरविला जाणारा आठवडा बाजार अन्यत्र हलवू नये, अशी मागणी सिंधुदुर्ग हॉकर्स फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मंत्री केसरकर यांनी आपली भूमिका जाहीर करताना हॉकर्स संघटनेला व व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने आता दमदाटी करून जागा बदलल्यास त्याच दिवशी सर्व व्यापारी आपल्या मालासह केसरकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी राजन तेली, संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी राजपुरोहित आदी उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद केले की, महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशन ही महाराष्ट्रातील फेरीवाल्यांची मान्यता प्राप्त संस्था असून सावंतवाडीसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी फेरीवाले (हॉकर्स) हे आमच्या संस्थेचे सभासद आहेत. शहरात दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारासाठी सुमारे २०० ते २५० फेरीवाले आपला व्यवसाय करतात. आठवडा बाजारामध्ये सावंतवाडीत कमी व रास्त दरात ताजा माल उपलब्ध होतो. अलीकडेच मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आठवडा बाजाराची जागा बदलण्यासह तो चार वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी आम्हा फेरीवाल्यांची बाजू व याबाबतचे म्हणणे समजून घेतलेले नाही. आम्हाला या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही. यापूर्वी देखील शहरातील आठवडा बाजार स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून फेरीवाले व आठवडा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची याबाबतची मते जाणून न घेता एकतर्फी निवडीतूल आठवडा बाजाराचे ठिकाण बदले होते. सर्वोच्य न्यायालयाने हॉकर्स संदर्भात प्रशासनाची काय भूमिका असली पाहिजे, याबाबत वेळोवेळी आपल्या न्याय निर्णयाद्वारे निर्देशित केले आहे. त्यामुळे आठवडा बाजाराची जागा बदलताना अवकाश संघटना व व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे. निवडण्यात आलेली जागा चुकीची असल्यामुळे योग्य जागा उपलब्ध होईपर्यंत बाजार तलावाकाठीच भरविण्यात यावा. दमदाटीने प्रशासनाने जागा बदलल्यास मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर व्यापारी आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com