शिवरायांमुळेच गोमंतक संस्कृती सुरक्षित

शिवरायांमुळेच गोमंतक संस्कृती सुरक्षित

swt1225.jpg
95351
गोवा : शिवसंस्कार संस्थेचा भेटवस्तू देऊन गौरव करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

शिवरायांमुळेच गोमंतक संस्कृती सुरक्षित
डॉ. प्रमोद सावंतः शिवसंस्कार संस्थेचा गोव्यात गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांमुळेच गोमंतक भूमी आणि संस्कृती टिकून राहिली, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील मातृभूमी शिक्षण संस्था आणि ‘शिवसंस्कार’तर्फे आज साखळी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारापासून प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या शिवसंस्कार संस्थेचे यावेळी त्यांनी अभिनंदन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
साखळी (गोवा) येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या या सोहळ्याला डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, टीव्ही आणि सिने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष अभिनेते स्वप्नील राजशेखर, मंदार गावडे, ‘मातृभूमी’च्या अध्यक्ष डॉ. सोनाली लेले, शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, गोव्यातील सुभाष मळीक, संदीप दळवी आदी उपस्थित होते.
नाटक, सिनेमा यांच्यापुरते मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे मत स्वप्नील राजशेखर यांनी व्यक्त केले. आगामी काळात शिवसंस्कारच प्रत्येकाला तारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. शेट्ये यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहीत करून द्यावा, असे आवाहन केले. पुणे येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि संघर्ष प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. लेले यांनी आभार मानले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे अच्युत सावंत-भोसले, प्रेमानंद देसाई यांचेही ''शिवसंस्कार''च्या उपक्रमांना सहकार्य लाभले.

चौकट
मान्यवरांचे सत्कार
या सोहळ्यात पांडुरंगजी बलकवडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुणे), वल्लभ देसाई (इतिहास अभ्यासक, गोवा) आणि प्रभाकर ढगे (पत्रकार, साहित्यिक) यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तर नारायण मानकर (मुख्याध्यापक, कळसूलकर हायस्कूल, सावंतवाडी), अनिल ठाकर (शिक्षक, कळसूलकर हायस्कूल, सावंतवाडी), प्रज्ञा मातोंडकर (मळगाव), अतुल मळीक (कुडणे), गोविंद साखळकर (डिचोली) आणि अवधूत बिचकर (शिवसंस्कार डिजिटल प्रसारक, कराड) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात ''शिवसंस्कार'' अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com