सासोली ग्रामस्थांचे उपोषण अखेर मागे

सासोली ग्रामस्थांचे उपोषण अखेर मागे

swt1237.jpg
95415
दोडामार्गः उपोषणकर्त्यांना आश्वासनाचे पत्र देताना तहसीलदार अरुण खानोलकर. (छायाचित्र ः संदेश देसाई)

सासोली ग्रामस्थांचे उपोषण अखेर मागे
तहसिलदारांचे आश्वासनः अकृषिक सनद रद्द करणार
सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. १२ः सासोली सामायिक जमिनीच्या प्रकरणात महसूल विभागाने शासकीय नियम धब्यावर बसून दिलेल्या अकृषिक सनद, आकार फोड रद्दसाठी महसूल विभाग विरोधात छेडले होते. अकृषिक सनद, आकार फोड रद्द व अन्य अनधिकृत चालणाऱ्या कामांना स्थगिती देणार असल्याचे लेखी आश्वासन तहसिलदार अरुण खानोलकर यांनी दिल्याने ग्रामस्थांनी आज तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले.
सासोली येथील सामायिक जमिनींपैकी काही जमिनींना महसुल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदे, नियमांना केराची टोपली दाखवत अकृषिक सनदा व आकार फोड करण्यास परवानगी दिली होती. त्या रद्द करण्यात याव्यात तसेच अन्य चालणारी अनधिकृत कामे बंद करण्यात यावी, यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर सासोली ग्रामस्थांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. याला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत पाठिंबा दिला होता. राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकरणात जातिनिशी लक्ष घातले होते. सकाळपासूनच तहसिलदार यांच्या दालनात राजकीय नेत्यांनी बैठका घेतल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, शिवसेना तालुका प्रमुख ( शिंदे गट ) गणेश प्रसाद गवस आदींनी विषय उचलून धरला. त्यामुळे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तहसीलदार खानोलकर यांनी सासोली येथे सामायिक क्षेत्रात प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली. सायंकाळी तहसिलदार यांच्या दालनात उपोषणकर्त्यांसमवेत बैठक घेतली; परंतु ठोस निर्णय मिळाला नसल्याने उपोषण चालूच राहिले. मंगळवारी (ता.११) सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व तहसिलदार यांच्यात बैठक झाली. याला भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व तालुकाध्यक्ष सुधीर दळवी तसेच सासोली ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी कडक भूमिका घेतली. उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने प्रशासनास नमती बाजू घ्यावी लागली.
दरम्यान, पालकमंत्री चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाडकर्णी व तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांच्या नेतृत्वाखाली सासोली ग्रामस्थांनी त्यांची सिंधुदुर्गनगरी येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. आपल्यावर दोडामार्ग महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या अन्यायाबाबत सविस्तर सांगितले व याबाबतचे एक निवेदनही त्यांच्याकडे सादर केले. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी निवेदनावर शेरा मारत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यांवर कारवाई करा व ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिल्या आहेत, अशी माहिती श्री. नाडकर्णी यांनी दिली. 
------------
काय दिले आश्वासन
तहसिलदार खानोलकर यांनी सासोलीतील सामायिक जमीन क्षेत्रातील अकृषिक सनद व आकारफोड रद्द करण्याचे आश्वासन दिले. याबरोबरच भूमी अभिलेख विभागाला मोजणी तात्काळ बंदचे आदेश, वृक्षतोडीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे वनविभागाला आदेश आणि अनधिकृत बांधकाम आढळल्यास पोलीस बंदोबस्त घेऊन पाडण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.
------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com