सासोलीत खैराचा साठा जप्त

सासोलीत खैराचा साठा जप्त

95888
दोडामार्ग : येथे शुक्रवारी जप्त केलेल्या खैर लाकडाच्या साठ्यासोबत वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार.

सासोलीत खैराचा साठा जप्त
वनविभागाची कारवाई; एक संशयित रडारवर
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ ः तालुक्यातील सासोली येथे एका शेतकऱ्याच्या काजू बागेत साठा करून ठेवलेले एक घनमीटर खैराचे लाकूड वन विभागाने छापा टाकून जप्त केले. या प्रकरणी संशयित हेमंत देसाई (रा. पिसुर्ली, सत्तरी गोवा) याला चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती दोडामार्ग वनक्षेत्रपाल अरुप कन्नमवार यांनी दिली.
सासोली येथील एका शेतकऱ्याच्या बागेत खैर लाकूड असल्याची माहिती कन्नमवार यांना मिळाली. त्यांनी पथकासमवेत कारवाई व पंचनामा केला. जप्त लाकूड दोडामार्ग येथील वनविभाग कार्यालयात आणले. याबाबत चौकशी सुरू असून संशयित म्हणून देसाई याला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. कारवाईत सहायक वनसंरक्षक सोनावडेकर, वनपाल संग्राम जीतकर, वनरक्षक उमेश राणे, वनमजूर नारायण माळकर यांनीही भाग घेतला.
गोवा वनविभागाचा हस्तक्षेप
सासोली येथील वनविभागाच्या या कारवाईला एक वेगळेच वळण आले आहे. कारण खैर प्रजातीचा लाकूडसाठा आपला असल्याचे गोवा वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत. शिवाय याबाबत कुळे, गोवा येथील वन अधिकाऱ्यांनी दोडामार्ग वनक्षेत्रपाल कन्नमवार यांची भेट घेऊन साठ्याबाबत विचारणा केली. हा साठा गोवा वनविभागाकडे देण्याची विनंती केली. या वेळी गोवा वनविभागाचे सत्यवान गावस, सुरेश नाईक, सचिन सावंत या अधिकाऱ्यांसह वनरक्षक सुनील नाईक, गणपत मेळेकर, आशिष नाईक यांचे पथक आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com