डॉ. आंबेडकरांना देवगडमध्ये अभिवादन

डॉ. आंबेडकरांना देवगडमध्ये अभिवादन

96096
देवगड ः येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

डॉ. आंबेडकरांना देवगडमध्ये अभिवादन

देवगड, ता. १५ ः तालुक्यात ठिकठिकाणी काल (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे झाले. येथील महाविद्यालय नाका ते तहसील परिसरातील प्रांगणापर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. यानंतर गीतांचा नजराणा सादर झाला. अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी उपस्थितांना ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर संबोधित केले.
तालुक्यात ठिकठिकाणी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम पार पडले. जयंती कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तालुक्यातील युवा पिढीला माहिती होण्यासाठी अ‍ॅड. डोळस यांचे ‘शिवराय ते भीमराय’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समितीचे अध्यक्ष के. एस. कदम, कार्यवाह दिलीप कदम यांच्यासह समितीचे अन्य सहकारी, तसेच देवगड, जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, मनीषा जामसंडेकर, हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com