आठवडा बाजार हलविणारच

आठवडा बाजार हलविणारच

96130
सावंतवाडी ः येथे माहिती देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर.

आठवडा बाजार हलविणारच

मंत्री केसरकर; सावंतवाडीत स्वार हॉस्पिटल समोरील जागेचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः मी सूचविलेल्या जागेत आठवडा बाजार नेल्यास आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हॉकर्स संघटनेच्या मागणीनुसार स्वार हॉस्पिटलच्या समोरील जागेचा पर्याय खुला आहे; मात्र काही झाले तरी मोती तलावाच्या काठावरचा आठवडा बाजार हलविण्यात येणार आहे, असा पुनरुच्चार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.
मंत्री केसरकर यांनी आज येथील राजवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना आठवडा बाजाराबाबत विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत ज्या ठिकाणी आठवडा बाजार आहे, त्या ठिकाणी तलावाचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा बाजार हलवून अन्य ठिकाणी नेण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. त्यासाठी मी शहरातील पर्यायी चार जागा सुचविल्या होत्या. त्यात रघुनाथ मार्केट आणि परिसरातील जागा चितारआळी, शांती निकेतन स्कूल ते मच्छीमार्केट आणि वसंत प्लाझा येथील नाल्यावरील जागेचा समावेश होता. त्या ठिकाणी बाजार नेल्यानंतर कोणतीही समस्या जाणवणार नव्हती. तसेच त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत; परंतु हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी माझी भेट घेऊन ती जागा मान्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांना आम्ही स्वार हॉस्पिटलच्या समोरील जागा सुचविली आहे. त्या ठिकाणच्या जागेबाबत त्यांनी विचार करावा. केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा. स्वार हॉस्पिटल समोरील जागेतही आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देऊ.’’
--
श्रेयासाठी नव्हे, तलावाचे विद्रुपीकरण नको
माजी नगराध्यक्ष माझे जवळचे आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी बाजार बसविला, त्याला माझा विरोध नाही किंवा मी हे श्रेयासाठी करीत नाही. तलावाचे विद्रुपीकरण होऊ नये आणि त्या ठीकाणी ज्येष्ठांना बसायला, चालायला मिळावे, यासाठी आठवडा बाजार हलविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com