बॅ. नाथ पैंचे विचार प्रेरणादायी

बॅ. नाथ पैंचे विचार प्रेरणादायी

96190
कणकवली ः येथील नाथ पै मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.


बॅ. नाथ पैंचे विचार प्रेरणादायी

दादा कुडतरकर; नाथ पै मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन

कणकवली,ता. १५ ः संसदपटू बॅ. नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचे काम बॅ. नाथ पै मित्रमंडळ करीत आहे. हा वारसा कायम जोपासण्याची जबाबदारी तरूणांची आहे. मंडळाच्या कोणत्याही उपक्रमास खारीचा वाटा असेल, अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी दिली.
शहरातील बॅ. नाथ पै मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयात समोरील मैदानावर नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटनप्रसंगी श्री. कुडतरकर बोलत होते. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (ता. १६) होणार आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मेघा गांगण, मानसी मुंज, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष तथा उद्योजक दीपक बेलवलकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, पत्रकार तुषार सावंत, मंडळाचे अध्यक्ष अमोल रासम, उपाध्यक्ष नीलेश राणे, खजिनदार अमित मयेकर, सचिव अनिल परब, सहसचिव सुभाष राणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार झाला. तसेच तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार अनिकेत उचले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
संदेश पारकर म्हणाले, ‘‘बॅ. नाथ पै हे उत्कृष्ट संसदपटू होते. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन हे बॅ. नाथ पै मंडळ सुरू केले. जेव्हा नाथ पै संसदेत भाषण करायचे, तेव्हा तेव्हाचे पंतप्रधान सभागृहात उपस्थित राहायचे. येथील जनताही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायची. जो पॅर्टन कणकवलीत राबविला जातो, त्याचे अनुकरण जिल्हा करतो. कणकवली शहर जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्वाचे शहर आहे. बॅ. नाथ पै मित्रमंडळाचे सर्वच उपक्रम कौतुकास्पद असतात. हे मंडळ जे जे कार्यक्रम हाती घेईल त्यावेळी आम्ही सर्वच जण आपल्या पाठीशी राहु.’’
सुशांत नाईक म्हणाले, ‘‘१० वर्षांपूर्वी बॅ. नाथ पै मित्रमंडळाने मदत केली नसती तर मी नगरसेवक झालो नसतो. मी पहिल्यांदा नगरसेवक होण्यामध्ये या मंडळाचे योगदान मोठे आहे. या मंडळाच्या सदस्यांमुळे आणि येथील जनतेच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक होऊ शकलो अशी कबुली त्यांनी दिली. तसेच याच मंडळातून अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा खेळलो. आताच्या धावपळीच्या युगात मंडळाच्या काही कार्यक्रमांमध्ये खंड पडला असला तरी यापूर्वी विविध स्पर्धा हे मंडळ राबवित होते. त्याचा मी हिस्सेदार होतो. आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हे मंडळ सामाजिक कार्यक्रमांसाठी सक्रिय झाले असल्याचा अभिमान मला आहे असे त्यांनी सांगितले. अबीद नाईक, मंडळाचे अध्यक्ष अमोल रासम यांनीही मनोगत व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशांत कुडतरकर, योगेश मुंज, मिथिलेश जोगळे, प्रांजल चव्हाण, मंगेश राणे, समीर पावसकर, अमित राणे, संदेश मयेकर, गौरव मुंज, चेतन वालावलकर, ओमकार चव्हाण, सिद्धेश सावंत, स्वप्नील तांबे, विल्सन पिंटो, वैभव सावंत हे मेहनत घेत आहेत. या स्पर्धेत ७ संघांनी सहभाग घेतला आहे. सूत्रसंचालन राजेश कदम व विलास गोलतकर यांनी केले.
---
अन् बंडू हर्णेंची कोपरखळी
गणेश उर्फ बंडू हर्णे म्हणाले, ‘‘कणकवलीतील खेळाडूंना खेळांचा सराव करता यावा यासाठी न.पं.ने क्रीडा संकुल उभारले आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी येत आहे. बॅ. नाथ पै मित्रमंडळ हे शिस्तबद्ध मित्रमंडळ असून न.पं.च्या माध्यमातून बॅटमिंटन व कबड्डीचे मैदान स्पोटर्स संकुलात उपलब्ध करून दिले आहे. न. पं. च्या माध्यमातून क्रीडांगणासाठी पहिल्या टप्प्यातील ४ कोटी रुपये निधी आमदार नीतेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. पुढील वर्षी हक्काचं मैदान उपलब्ध होईल. नगरसेवक होण्यासाठी सुशांत नाईक यांच्या पाठिशी हे मंडळ राहिले असेल. मात्र, नगराध्यक्ष समीर नलावडे होण्यासाठी देखील या मंडळाचे मोठे योगदान असल्याचे सांगत कोपरखळी श्री. हर्णे यांनी लगावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com