असलदेत गव्यांकडून काजू बागेचे नुकसान

असलदेत गव्यांकडून काजू बागेचे नुकसान

swt१८१.jpg
९६७६०
असलदेः येथे गवारेड्यांनी काजू बागेचे केलेले नुकसान.

असलदेत गव्यांकडून
काजू बागेचे नुकसान
नांदगाव, ता. १८ ः असलदे गावात गवारेड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून बौद्धवाडी येथील प्रगतशील शेतकरी विनोद तांबे यांच्या काजू बागेतील ७ ते ८ मोठी झाडे मोडून टाकत नुकसान केले. गेले काही दिवस या भागात गव्यांकडून नुकसान सत्र सुरूच असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय परिसरातील ग्रामस्थांसह लाकूड फाटा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या काजू बागायतदार शेतकरी बागांमध्ये काम करतात. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
...................
swt१८२.jpg
96816
देवबागः नृत्य स्पर्धेत विजेत्या मृणाल सावंतला गौरविताना चंद्रशेखर कुमठेकर, नितीन जाधव, सागर सारंग, नमिता गावकर, दादा सातोसकर आदी.

एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती
कुडाळः देवबाग (ता. मालवण) येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी-कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. श्री हनुमान सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, देवबाग यांच्यावतीने हनुमान मंदिराच्या ३८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत द्वितीय समर्थ गवंडी, तृतीय शंकर गवस, उतेजनार्थ विश्लेषा मंडलिक, मंत्रा कोळबकर यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण झी मराठी ''एका पेक्षा एक'' सेलिब्रिटी नितीन जाधव (मुंबई), सागर सारंग, नमिता गावकर (देवबाग) यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुमठेकर, महेश तांडेल, आनंद कुमठेकर, स्पर्धेचे प्रायोजक जीजी चोपडेकर, ओमकार वेंगुर्लेकर, तुळशीदास कासवकर, वैकुठ कांदळगावकर, निखिल कासवकर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन अवधूत सातोसकर यांनी केले.
....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com