पोखरण-बौद्धवाडीसाठी व्यायामशाळा 
मंजुरीसाठी नीलेश राणेंचे प्रयत्न

पोखरण-बौद्धवाडीसाठी व्यायामशाळा मंजुरीसाठी नीलेश राणेंचे प्रयत्न

96772
नीलेश राणे

पोखरण-बौद्धवाडीसाठी व्यायामशाळा
कुडाळ ः तालुक्यातील पोखरण-बौद्धवाडी येथे व्यायामशाळा व्हावी, यासाठी भाजप ओरोस मंडल मागास वर्गीय सेलचे अध्यक्ष विनोद कदम यांनी भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्यामार्फत भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राणे यांनी पोखरण-बौद्धवाडीसाठी व्यायामशाळा मंजूर केली. पोखरण येथील आनंद कदम यांच्या जागेत ही व्यायामशाळा साकारणार असून उभारणीनंतर राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आहे. याबद्दल भाजप नेते राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे पोखरण बौद्ध विकास मंडळ, पोखरण गाव शाखा, सावित्रीबाई महिला मंडळ, पोखरण आणि ब्लू स्टार कला व क्रीडा मंडळ, पोखरण यांच्यावतीने आभार मानले.
..............
96771
शमिका देसाई

शमिका देसाईचे परीक्षांमध्ये यश
कुडाळ ः शहरातील पांडुरंग शेठ पडतेवाडी कुडाळ शाळेची तिसरीची विद्यार्थिनी शमिका देसाई हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ९७ गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत १८२ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. तिला पडतेवाडी शाळेचे शिक्षक लक्ष्मण आगलावे, आई-वडील तसेच अनघा मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले. शमिका ही औषध व्यावसायिक गुरुनाथ देसाई व पूनम देसाई यांची मुलगी होय. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com